pune sakal
पुणे

Gram Panchayat Election : मेडदच्या निवडणूकीला जबरी हाणामारीने गालबोट; हाणामारीत पिस्तूलचा वापर झाल्याचा एकमेकांविरुद्ध तक्रारी

ही मारहाण व जातीवाचक शिवीगाळ सातपेक्षा अधिक लोकांनी संगणमताने केली.

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव - मेडद (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीला कार्य़कर्त्यांच्या हाणामारीने गालबोट लागल्याची माहिती पुढे आली. या निवडणूकीमध्ये परस्परविरोधी काम केल्याच्या कारणावरून माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्य़कर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. शनिवार ( ता. ४) रोजी रात्रीच्यावेळी वरील घटना घडली.

या घटनेचे पडसाद आज मतदानाच्या दिवशी पडू नये, कायदासुव्यवस्था बिघडू नये, या उद्देशाने उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी मेडदमध्ये तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. याशिवाय माळेगाव पोलिस ठाण्यात वरील प्रकरणी जखमींच्या परस्परविरुद्ध आलेल्या तक्रारींचीही दखल घेत पोलिसांनी तब्बल २४ संशयित आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले. केवळ गुन्हे दाखल केले नाहीत

तर पोलिसांनी वरील गुन्ह्यातील बहुतांशी आरोपींना अटक करीत जेरबंद केले आहे. त्यामुळे रविवारी मेडद येथील मतदान प्रक्रिया सुरळीत चालू राहिली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक देविदास साळवे यांनी दिली.

दरम्यान, प्रसिक बाल कांबळे ( रा. मेडद) यांनी सातपेक्षा अधिक लोकांनी कोयत्याच्या सहाय्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्य़ाद माळेगाव पोलिस ठाण्यात दिली. `` माझा मित्र नितीन भारत मोहिते हा त्यांचे विरोधी पॅनलमध्ये उभा राहिला, तसेच त्याचे पॅनलविरुध्द मी प्रचार केला, असा राग मनात धरुन संतोष शिवाजी यादव याने नितीन मोहिते यास डोक्यात कोयता मारत त्याला जखमी केले.

ही मारहाण व जातीवाचक शिवीगाळ सातपेक्षा अधिक लोकांनी संगणमताने केली. त्यामध्ये माजी सरपंच अर्जुन शंकर यादव याचा समावेश आहे,`` अशी तक्रार कांबेळ यांनी फिर्य़ादीमध्ये नमूद केली. त्यानुसार पोलिसांनी वैद्यकिय अहवाल व उपलब्ध फिर्य़ादीच्या आधारे संतोष शिवाजी यादव, आनंद पांडुरंग यादव, सोनु पांडुरंग यादव,

अर्जुन शंकर यादव (माजी सरपंच, मेडद), राजाराम विश्वनाथ गाढवे, रोहिदास रामचंद्र निकम, राजाराम विश्वनाथ गाढवे (सर्व रा.मेडद) यांच्यासह पाच ते सात लोकांविरुद्ध अॅट्राॅसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दुसरीकडे, फिर्यादी अर्जुन शंकरराव यादव (वय ५९ रा. मेडद) यांनी रात्रीच्यावेळी पिस्तूलाचा धाक दाखवून माझ्या अंगावरील सुमारे ९ लाख रुपये किंमतीचे सोन्याचा ऐवज सहाजणांनी चोरून नेला,

अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी बंडा काशिद, गणेश काशिद, माउली काशिद, सोनाजी मोरे, मानसिंग जाधव, सागर शिंदे ( सर्व रा. मेडद) यांच्याविरुद्ध दरोडा टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच फिर्यादी संतोश शिवाजी यादव ( रा. मेडद ) यांच्या फिर्य़ादीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी सुधिर गावडे, बबन गावडे, नितीन माहीते, भैय्या मोहिते, ऋशी गावडे, देविदास गावडे, प्रकाश मोरे

विकास मोरे, अजित कांबळे, सिताराम कांबळे, प्रसिक कांबळे (सर्व रा. मेडद) यांच्याविरुद्ध पिस्तूलाचा धाक दाखवून एक लाख ३० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज घेवून गेल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी किरण अवचर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : त्रिभाषा धोरण समितीला मुदतवाढ, प्रचारात भाषावाद वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT