पुणे

भिगवणमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकिय हालचालींना वेग आला असुन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाविरुध्द स्व. रमेश जाधव प्ररित सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. श्रीनाथ पॅनेलच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वतीने आयोजित बैठकीसाठी इंदापुर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, गुलामभाई शेख, माजी उपसरपंच हरिश्चंद्र पांढरे, अभिमन्यु खटके, जयदीप जाधव, संजय रायसोनी, तुषार क्षीरसागर, राजेंद्र जमदाडे व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक शिंदे म्हणाले, ''सत्ताधाऱ्यांनी मागील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी एक बदल घडवा सर्व बदल घडतील अशी घोषणा केली होती, परंतु पाच वर्षात केवळ सरपंच व उपसरपंच हेच बदलत गेले. गावांमध्ये मात्र कोणताही बदल घडला नाही. सत्ताधाऱ्यांकडून केवळ सत्तेच्या संगित खुर्चीचाच खेळ खेळला गेला. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी अशा मुलभूत प्रश्नांनी गंभीर स्वरुप धारण केले आहे. स्व. शंकरराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भिगवणचा नेत्रदिपक विकास करु.'' 

पराग जाधव म्हणाले, ''स्व. रमेश जाधव यांच्या संकल्पनेतील गाव निर्माण करण्यासाठी गावाच्या विकास केंद्रबिंदू मानून श्रीनाथ पॅनेलची रचना करण्यात आली आहे. या पॅनेलमध्ये गावाच्या विकासाबाबत संवेदशील असणाऱ्या सर्वपक्षीय उमेद्वारांना संधी देण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी पक्षाचे, धर्माचे, जातीचे जोडे बाहेर ठेवण्यात येणार आहे.'' 

प्रास्ताविक अजित क्षीरसागर यांनी केले. सुत्रसंचालन जावेद शेख यांनी केले तर आभार गुलामभाई शेख यांनी मानले. बैठकीसाठी भिगवण व भिगवण स्टेशन येथील संभाव्य उमेद्वार व नागरिक उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वेचे खेळाडू दुसऱ्या T20I सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून का उतरले? जाणून घ्या खरं कारण

सध्या काय करतात 'पंढरीची वारी' चित्रपटातील कलाकार? बालकलाकारासह अनेकांचं निधन; केवळ तिघेच जिवंत

Karjat Lonavala railway block : कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगात; २५ ते २८ जुलैदरम्यान अनेक एक्स्प्रेस रद्द

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

IND vs WI ODI Squad: यशस्वी, ऋतुराज IN; श्रेयस, इशान, बुमराहसह ७ खेळाडू OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ... असं का होणार?

SCROLL FOR NEXT