The granddaughter and Grandfather drowned and died in chas canal 
पुणे

पाय घसरून नात कालव्यात पडली; वाचविण्यासाठी आजोबांनीही मारली उडी, दोघांचाही बूडून मृत्यू

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ(पुणे) - चास (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शेगरमळा येथे मंगळवारी दुपारी हुतात्मा बाबू गेनू सागराच्या डाव्या कालव्यात सदाशिव विष्णू शेगर (वय ७०) व त्यांची नात अन्विता प्रल्हाद शेगर (वय ९) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सदाशिव विष्णू शेगर, नात अन्विता प्रल्हाद शेगर व स्वरा प्रल्हाद शेगर (वय ७) हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. जवळच हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डावा कालवा आहे. अन्विता नजर चुकवून कालव्याकडे गेली. पाय घसरून कालव्यात पडल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी कालव्यात उडी घेऊन अन्विताला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तेही पाण्यात बुडाले. त्यावेळी स्वराने व परिसरातील महिलांनी आरडाओरड केला.

सिद्धेश संतोष शेगर याने परिसरातील तरुणांना घटनेची माहिती दिली. शेगरमळ्यातील दत्ता शेगर, रेवभाऊ शेगर, संतोष शेगर,  मनोज बारवे व राहुल काळे या तरुणांनी तत्काळ कालव्यात उड्या घेतल्या. सदाशिव विष्णू शेगर व अन्विता प्रल्हाद शेगर यांना पाण्याबाहेर काढण्यात तरुणांना यश आले. तरुणांनी बन्सी शेगर यांच्या गाडीतून ताबडतोब आजोबा व नातीला घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वी दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Statement : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? सुनिल तटकरे छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांनी केलं वक्तव्य

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

'देऊळ बंद'च्या त्या सीननंतर गश्मीरसोबत ४ दिवस बोलत नव्हती ऑनस्क्रीन लेक; कारण सांगत म्हणाली-

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरणात डॉ. मनोज शिरुरेला 5 दिवसांची CBI कोठडी

'बॉलिवूडमध्ये मराठी कलाकरांना घाटी म्हणतात' वैभव मांगले हिंदी सिनेसृष्टीबद्दल स्पष्टच बोलले... म्हणाले...

SCROLL FOR NEXT