पुणे

हृदयद्रावक : अश्रूंना बांध घालत आजीं लेकीसह झगडताहेत जगण्यासाठी 

जितेंद्र मैड

कोथरूड : एका पाठोपाठ मोठ मोठी संकटे आले की माणूस खचून जातो. पण जीवनात असे काही क्षण येतात की मनाला पुन्हा जगण्याची उभारी मिळते. अशीच काहीशी घटना सिंधुताईंच्या बाबतीत घडली.

नवरा आजाराने अन् मुलगा आणि सून आपघातात गेले. असा तिहेरी आघात बसल्यावर जगण्यात काय अर्थ असा विचार मनात आलेल्या सिंधू बबन आढाव यांनी आपल्या लेकीसाठी सर्व धीर एकवटून नवी उभारी धरली. कात्रज येथे नाल्याच्या कडेला आपला विखुरलेला संसार थाटला. फुलांचे हार करून विकणे, हॉटेलसाठी मोरीकाम, चपात्या बनवून उदरनिर्वाह सुरु केला. 

अशातच कोरोनाची साथ आली आणि सर्व जग थांबले. आता आपल्याला कोण सावरणार या विवंचनेत पडलेल्या माय लेकींची देवाने पण परिक्षाच पहायचे ठरवले होते. अवकाळी वादळी पावसाने घरावरचे छप्परच उडून गेले. साऱ्या घरात पाणीच पाणी झाले.

तशाही स्थितीत डोळ्यातले अश्रू थांबवत आजींनी पदरात देव बांधून जपून ठेवले. निराधार स्थितीतही स्वतः ची काळजी सोडून देवाची पूजा मात्र नित्यनेमाने सुरु होती. कोरोना काळात हातात झाडू घेवून त्या स्वारगेटपर्यंत जायच्या. जे काही मिळेल ते घेवून यायच्या. त्यावरच त्यांची गुजरान चालली होती.

या आजीची करुण कहाणी महारुद्र परिवाराचे साधक प्रकाश शिंदे यांना कळताच त्यांनी 51 हजार रुपयांची मदत आजीला देवू केली. शिंदे म्हणाले, ''घरावरचे पत्रे उडाले असताना तुला कुलूप लावायची गरज का वाटली असे विचारल्यावर ती माऊली म्हणाली, बाबा घरातल्या कोपऱ्यात पितळाचे देव आहेत. कोणाचा काय भरवसा. तोच एक आधार आहे मला. त्यांची श्रध्दा पाहून रहावले नाही. माता माऊलीचे तुटलेलं घर (बांधकाम) आणि संसार सावरून देण्याचे वचन देऊन आलो. कात्रज येथील एका मित्राला त्याच्या हॉटेलात त्यांना काम दे आणि एक देवकार्य कर असे सांगितले आहे. त्यानेही होकार दिला आहे. लवकरच आज्जी आणि ताई तिथे कामावर रुजू होतील.''

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT