पुणे

अनुदान एकीचे, जमा दुसरीकडे

भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देहविक्रीय करणाऱ्या महिलांना कोरोनाच्या संकटात देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम काही कष्टकरी महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भ्रष्ट कारभारात सहभागी असलेल्या कथित स्वयंसेवी संस्था आणि अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवारी कष्टकरी महिलांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रक्कम परत घेण्याची मागणी केली होती.

देहविक्रीय करणाऱ्या स्त्रियांच्या साहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा झालेले पैसे आमचे नसून ते परत घ्यावेत. हे कारस्थान रचणाऱ्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कष्टकरी महिलांनी केली.

दरम्यान, देहविक्रीय करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या अनुदान रक्कम योजनेत कष्टकरी महिलांचा समावेश करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर स्वतः कष्टकरी महिलांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार आणि अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांना आपली कैफियत ऐकवली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निदर्शने केली. तसेच, फसवणूक करून दिलेली रक्कम परत घ्यावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

''हा प्रकार गंभीर असून, या भ्रष्ट कारभाराची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी. यात दोषी आढळलेल्या संस्था आणि व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.''

- नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते

असा केला घोटाळा

  • - स्वयंसेवी संस्थेच्या म्हणवणाऱ्या तीन महिलांनी हडपसर भागातील घरकामगार, मोलकरीण, कष्टकरी महिलांना गाठले.

  • - केंद्र सरकारच्या योजनेतून घरकामगार, मोलकरीण यांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करणार आहोत असे सांगितले.

  • - त्यासाठी आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड व बँकेचे पासबुक मागितले.

  • - काही दिवसांतच पैसे जमा होतील. त्यातील निम्मे आम्हाला परत करावे लागतील, असे सांगितले.

  • - हलाखीच्या परिस्थितीमुळे कष्टकरी, अल्पशिक्षित, निरक्षर महिलांनी कागदपत्रे विश्वासाने संस्थेच्या महिलांच्या हवाली केली.

  • - यापैकी काही महिलांच्या खात्यावर २३ एप्रिलला प्रत्येकी १५ हजार रुपये अनुदान जमा झाले.

  • - त्यानंतर संस्थेच्या महिला व इतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे निम्मी रक्कम परत मागण्यास सुरवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT