usha-kakade 
पुणे

कोरोना काळातही ‘ग्रॅव्हिट्‌स’चे योगदान

सकाळवृत्तसेवा

पुणे - समाजातील दीनदुबळ्यांचे अश्रू पुसून त्यांना मदतीचा हात देण्यासह दृष्टिहीन मुलांना नवदृष्टी देणाऱ्या ‘ग्रॅव्हिट्‌स फाउंडेशन’ने कोरोनाच्या काळातही आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे. कोरोनाच्या मृतांसाठी विशेष बॉडी बॅगची व्यवस्था करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम फाउंडेशनने केले आहे. त्यामुळे नातेवाइकांना सुरक्षितपणे अंत्यदर्शन घेता आले.  

महिला सबलीकरण आणि बालविकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यकर्त्या उषा काकडे यांनी २०११ मध्ये ‘ग्रॅव्हिट्‌स फाउंडेशन’ची स्थापना केली. त्या दृष्टीने फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फाउंडेशनने गेल्या दहा वर्षांपासून अनेक प्रकल्प राबविले आहेत. यात महापालिकेच्या ३११ शाळांमधील ७२ हजार ८२३ विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा तपासणी करण्यात आली. त्यानंतर ३०७ शाळांतील ७८ हजार २८९ विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे अभियान राबविण्यात आले. त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी देण्यात आली. मुलींना स्वसंरक्षणासाठी १७४ महाविद्यालयांमध्ये ‘चेंज मेकर्स’ या प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे देण्यात आले. यातून जवळपास २ हजार विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक रक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर ‘गुड टच-बॅड टच’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सध्या फाउंडेशनने हाती घेतला आहे. फाउंडेशनने अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण एक हजार शाळांमधील सहा लाख विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ३ लाख २३ हजार ९४४ विद्यार्थ्यांपर्यंत फाउंडेशन यशस्वीरीत्या पोचले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या काळात सुरुवातीला समाजात भीतीचे वातावरण होते. आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण होता. कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास, सुरक्षेच्या कारणास्तव नातेवाइकांना त्याला पाहण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र त्यावर फाउंडेशनने उपाय शोधून काढला. मृतांसाठी वैद्यकीय मान्यता असलेल्या ‘बॉडी बॅग’ ससून रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आल्याने नातेवाइकांना अंत्यदर्शन घेता आले. तसेच लॉकडाउनमध्ये अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. यातही फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत समाजातील दीनदुबळ्या-गोरगरिबांना अन्नधान्य, जेवण व इतर साहित्यही पुरविले. तसेच समाजात कायमच दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या फाउंडेशनची स्थापनाच मुळात दीनदुबळे, रंजल्या-गांजल्यांच्या मदतीसाठी केली आहे. गेली दहा वर्षे मी समाजातील वेगवेगळ्या घटकांबरोबर काम करत आहे. आतापर्यंत हजारो मुलांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करून नवदृष्टी दिली आहे. आता पुणे आणि राज्याबाहेर कार्य करण्याचा निर्णय घेतला असून, देशभर ही चळवळ राबविण्याचा संकल्प आहे. 
- उषा काकडे, संस्थापक अध्यक्षा, ग्रॅव्हिट्‌स फाउंडेशन

कोरोनाच्या काळात ग्रॅव्हिट्‌स फाउंडेशनने मोलाची कामगिरी केली. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनेकांच्या नातेवाइकांना मृतदेहाचे अंतिम दर्शन घेता येत नव्हते; मात्र फाउंडेशनने पुढाकार घेऊन ससून रुग्णालयाला ‘बॉडी बॅग’ उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे नातेवाइकांना अंत्यदर्शन घेणे सुलभ झाले. आम्ही फाउंडेशनचे मनापासून आभारी आहोत.
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

राष्ट्रीय पातळीवर सन्मान
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी फाउंडेशनतर्फे ‘ऊर्जा ॲवॉर्ड’ दिले जाते. फाउंडेशनच्या अनेकविध कार्याची दखल घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ब्रिटनच्या संसदेतही फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे यांचा सन्मान झाला आहे. पुण्यात लावलेले ग्रॅव्हिट्‌स फाउंडेशनचे रोपटे आता देशभर पसरत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT