Shivajirao Bhosale Cooperative Bank Sakal
पुणे

शिवाजीराव भोसले बॅंकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा; २१० कोटींच्या ठेवी परत

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमधील पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना आजअखेर सुमारे २१० कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमधील पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना आजअखेर सुमारे २१० कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत.

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमधील (Shivajirao Bhosale Bank) पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना (Depositor) आजअखेर सुमारे २१० कोटींच्या ठेवी परत (Return) करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ कोटींच्या ठेवी वाटप (Distribute) करण्यात येत असून, त्यापैकी जानेवारी महिन्यात सुमारे २५ कोटी रुपये परत करण्यात येतील. त्यामुळे शिवाजीराव भोसले बॅंकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बॅंकेतील संचालकांच्या कथित गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. ठेवीदारांना खात्यातून एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येत नव्हती. त्यामुळे ठेवीदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. केंद्र सरकारच्या ठेव विमा कायद्यातील सुधारणेनंतर बॅंकांमधील ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ठेवीदारांना विमा संरक्षणांतर्गत ठेव रक्कम मिळणारी अवसायनातील ही शहरातील पहिलीच बॅंक आहे.

सुमारे १७ हजारांहून अधिक खातेदार-ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी केवायसी अर्ज भरून दिले होते. त्यापैकी सुमारे १६ हजार ठेवीदारांना ठेव रक्कम वितरित करण्यात आली. उर्वरित ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येत आहेत. ठेवीदारांसाठी केवायसी अर्ज भरून देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

- डॉ. आर. एस. धोंडकर, अवसायक, शिवाजीराव भोसले बॅंक

३१ मे २०२१ अखेर शिल्लक रक्कम व्याजासह

ठेवीदारांच्या खात्यात ३१ मे २०२१ अखेर असलेली शिल्लक रक्कम परत करण्यात येत आहे. व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवीदारांच्या इतर बॅंक खात्यात ऑनलाइन जमा करण्यात येत आहे, असे डॉ. धोंडकर यांनी सांगितले.

केवायसी अर्जासोबत कागदपत्रे (झेरॉक्स दोन प्रतींमध्ये)

- ठेव रकमेची पावती, दोन छायाचित्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, इतर बॅंकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड

अवसायनापूर्वी बॅंकेची स्थिती

  • शाखा १४

  • एकूण ठेवी ४३२ कोटी रुपये

  • ठेवीदार संख्या ७१ हजार ७७०

  • एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदार : ६३ हजार ६५८

  • एक ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीदार : ६ हजार ३००

  • पाच लाख रुपयांवरील ठेवीदार : १ हजार ८१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT