Ministry of Agriculture and Farmers' Welfare
Ministry of Agriculture and Farmers' Welfare sakal
पुणे

उत्पादन व निर्यातीसह फूल प्रक्रिया उद्योगालाही मोठा वाव : नरेंद्र सिंह तोमर

कृष्णकांत कोबल

मांजरी : देशातील शेतकऱ्यांना फूल उत्पादन व निर्यातीसाठी मोठी संधी आहे. याशिवाय फूल प्रक्रिया उद्योगालाही मोठा वाव आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक संशोधनाची आवश्यकता आहे. मात्र, फुलांचे संकरीत वाण निर्माण करताना त्याच्या सुगंधावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले.भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या मांजरी बुद्रुक येथील केंद्रीय पुष्प संशोधन संचालनालयाचे नूतन कार्यालय आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. त्यावेळी ते बोलत होते.(Ministry of Agriculture & Farmers' Welfare)

केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. तिलोचन महापात्रा, उपमहासंचालक डॉ. आनंद कुमार सिंह, पुष्प संशोधन संचालनालय संचालक डॉ. के. वी. प्रसाद, डीडीजी हॉर्टिकल्चरल सायन्सेसचे डॉ. ए.के. सिंग यांच्यासह देशातील विविध संस्थांचे संचालक, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, शेतकरी, नर्सरी उद्योजक, खरेदीदार आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय कृषीमंत्री तोमर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त संशोधनाची गरज आहे. या क्षेत्रात आजून खूप काम करण्याचे बाकी आहे. संशोधकांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आहे. होत असलेल्या संशोधनातून नवी प्रगतशील शेतकरी पीढी पुढे येण्यास मदत होईल. गावातील लोक गावातच राहून मोठा रोजगार निर्माण होईल, असा प्रयत्न सुरू आहे.(Minister of Agriculture Narendra Singh Tomar)

फूलशेतीच्या विकासात सरकार मोठ्याप्रमाणात लक्ष घालीत आहे. या शेतीबाबत सध्या शेतीपूरक व निव्वळ फूलशेती असे दोन प्रवाह आहेत. भारतात फुलांना आध्यात्मिक व विविध कार्यक्रमात मोठे महत्व आहे. यातून पुढचा टप्पा प्रक्रिया उद्योगावर अवलंबून आहे. हा उद्योग यशस्वीपणे राबविला गेला तर फूलशेतीतून मोठी अर्थक्रांती होईल. त्यासाठी सरकारचे चांगले सहकार्य राहील.' बाजारातील अनिश्चिततेपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी गुलाबातील गुलकंद आणि इतर उत्पादनांमध्ये फुलांचे रूपांतर मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये करण्याच्या महत्त्वावर त्यांनी यावेळी भर दिला.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री चौधरी म्हणाले, "प्रयोगशाळेत विकसित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांच्या शेतात प्रसार झाला पाहिजे. सशक्त प्रयोगशाळा ते जमीन उपक्रमांद्वारे शेतकर्‍यांमध्ये विकसीत वाण लोकप्रिय केला पाहिजे.' अतिशय आशादायक वाण आणि तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. डॉ. टी. महापात्रा म्हणाले, "फ्लोरिकल्चरमध्ये निर्यातकेंद्रीत अर्थव्यवस्थेची प्रचंड क्षमता आहे. त्यासाठी जागतिक प्रवृत्तींशी सुसंगतपणे प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे.'

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत १११ संस्थांपैकी फ्लोरिकल्चरल पिकांवर काम करणारी ही फूल संशोधन संस्था आहे. दिल्ली येथील ही संस्था २०१४ मध्ये पुण्यात हलविण्यात आली. हडपसर जवळील मुंढवा- मांजरी रस्त्यावरील मांजरी शिवारात संस्थेचे संशोधन प्रक्षेत्र आहे. फुल संचालनालायच्या माध्यमातून विविध फुलांच्या वाणांवर येथे संशोधन सुरू आहे. यामध्ये शेवंती १५०, गुलाब ५०, ग्लाडिओलस ६०, गुलछडी २०, अस्टर आणि झेंडूच्या वाणांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

BV Srinivas : खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारला या निवडणूकीतुन हद्दपार करा : बी. व्ही. श्रीनिवास

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

SCROLL FOR NEXT