Crime News esakal
पुणे

Pune: पुणे पोलीसांची भारी कामगिरी, हाताच्या ठशांवरून उत्तर प्रदेशात जाऊन चोरांना पकडले

Pune police: राजपूत उत्तर प्रदेशात असल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.

सकाळ वृ्त्तसेवा

Latest Pune News: चोरीच्या गुन्ह्यात हाताच्या ठशांवरून आरोपीचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. मार्केटयार्ड परिसरातील एका सोसायटीत वर्षभरापूर्वी एका बंगल्यात घरफोडी करून पसार झालेल्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून १२ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

छोटू ऊर्फ सिदू भैय्यालाल राजपूत (वय ३०, रा. कानेमई, जि. कौशंबी, उत्तर प्रदेश, सध्या रा. शिंदे वस्ती, शिवनगरी, कोथरूड) आणि अनिलकुमार ऊर्फ बल्ली रामसिंग राजपूत (वय २७, सध्या रा. मंडई, मूळ रा. बलपूर्वा, जि. कौशंबी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गेल्या वर्षी मार्केट यार्डातील संदेश सोसायटीतील एका बंगल्यातून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा १४ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी चोरट्यांच्या हाताचे ठसे आढळून आले होते.

पोलिसांच्या पथकाने हाताच्या ठशांची पडताळणी केली. एक ठसा सराईत चोरटा छोटू राजपूत याचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. राजपूत याच्याविरुद्ध पुणे आणि मुंबईत घरफोडीचे ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. राजपूत उत्तर प्रदेशात असल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.

चौकशीत त्याने साथीदार अनिलकुमार याच्या मदतीने मार्केट यार्डातील संदेश सोसायटीत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून सोन्याची लगड, चांदीचे दागिने असा १२ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया देवरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक सुनील भापकर, अमित जाधव, हिरवाळे, कौस्तुभ जाधव, किरण जाधव आणि आशिष यादव यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

Latest Marathi News Live Update : क्रिप्टो गुंतवणूक योजनेच्या नावाखाली झालेल्या सुमारे 6.50 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड

Bribery Case Police : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ७ लाखांची लाच, खाकीला बदनाम करणाऱ्या शेख, कांबळेचा रुबाब उतरला

Bee Attack:परीक्षा संपताच विद्यार्थ्यांवर आग्या मधमाश्‍यांचा हल्ला; वाकी शिवणे येथील घटना; वाहनचालकाचा जीव धाेक्यात अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT