Milind Soman sakal
पुणे

Pune News : सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी 'ग्रीन राइड'; मिलिंद सोमण चालवणार ६५० किलोमीटर सायकल

सुदृढ आरोग्याचा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित ‘लाइफलाँग रिटेल ग्रीन राइड ३.०’ या सायकल प्रवासाला पुण्यातून प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सुदृढ आरोग्याचा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित ‘लाइफलाँग रिटेल ग्रीन राइड ३.०’ या सायकल प्रवासाला पुण्यातून प्रारंभ झाला. या उपक्रमांतर्गत फिटनेस आयकॉन आणि मॉडेल मिलिंद सोमण हे सायकलवरून विविध शहरांमधून सुमारे ६५० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

सोमण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी ‘लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रा. लि.’चे सह-संस्थापक भरत कालिया उपस्थित होते. १८ डिसेंबरला बंगळुरू येथे या एकल सायकल प्रवासाचा समारोप होणार आहे. या प्रवासात वाहतुकीच्या पर्यावरणपूरक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी सोमण १०० किलोमीटरचा प्रवास इलेक्ट्रिक स्कूटरवर देखील करणार आहेत.

सोमण म्हणाले, ‘‘सलग तिसऱ्या वर्षी ग्रीन राइड उपक्रमात सहभाग घेताना मला आनंद होत आहे. फिटनेसमुळे वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम लोकांसमोर आणण्यासाठीचा प्रयत्न म्हणून मी या मोहिमेकडे पाहतो. निरोगी आयुष्यासाठी व्यायामाला पर्याय नाही.

त्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ तरी स्वतःसाठी द्यायलाच हवा. आज अनेक व्यक्ती माझ्याकडे फिटनेसचे एक आदर्श उदाहरण म्हणून पाहतात, पालक त्यांच्या मुलांना माझे उदाहरण देतात. मात्र प्रत्येक व्यक्तीने स्वतः मेहनत घेत आपल्या मुलांसाठी आदर्श उदाहरण ठरावे, अशी माझी इच्छा आहे. हाच संदेश मी या उपक्रमातून देणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

SCROLL FOR NEXT