The guide and information board made it easy for tourists to reach Hadsar fort 
पुणे

पर्यटकांना हडसर गड सर करणे झाले सोपे; जाणून घ्या कसे?

दत्ता म्हसकर

जुन्नर(पुणे) : ऐतिहासिक हडसर उर्फ पर्वतगडावर मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन गृपच्या वतीने दिशादर्शक व माहिती फलक लावल्याने पर्यटकांना या गडावर फिरणे सोपे झाले आहे.

दुर्ग संवर्धनात अग्रेसर असणाऱ्या शिवाजी ट्रेल या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली किल्ले हडसरवर मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुपच्या दुर्ग संवर्धकानी रविवारी (ता.०६) रोजी हडसर गडाची ऐतिहासिक माहिती देणारा फलक, तसेच  दिशा दर्शक तसेच विविध वास्तूंची नावे सांगणारे फलक लावले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडसर येथे येणाऱ्या अनेक पर्यटक तसेच दुर्गप्रेमींना तसेच शिवप्रेमींना गडावरील वास्तू शोधणे हे जिकिरीचे होत असे. कारण या गडावरील बहुतांशी वास्तू जमिनीशी समतल आहेत. त्यामुळं ते शोधणं एकदम अडचणीचे होत होते. गडावरील प्रत्येक वास्तूची माहिती सहजपणे व कमी वेळात उपलब्ध व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे सर्व फलक लावण्यात आले.

याप्रसंगी शिवाजी ट्रेल चे विश्वस्त विनायक खोत व वनपाल शशिकांत मडके, मरहट्टे सह्याद्रीचे अमोल ढोबळे, सचिन गीते,राहुल चौधरी, उद्धव चौधरी निलेश काळे, आशिष जाधव, विनोद पाटील, गजानन सस्ते, सुमंत मौर्य यांच्या उपस्थितीत  सर्व फलकांची पूजा करून अनावरण  करण्यात आले. यावेळी गडावर उपस्थित असणारे शिवप्रेमी, पर्यटक व ट्रेकर्स यांनी सर्वांचे कौतुक केले. संस्थेच्या संवर्धन कार्यास शुभेच्छा दिल्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Vastu Tips: पिंपळ, तुळस की मुख्य दार? पितृपक्षात संध्याकाळी का अन् कुठे लावावा दिवा? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा अन् फायदे!

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

SCROLL FOR NEXT