Gujrat_ATS 
पुणे

Breaking : गुजरात ATSची पुण्यात मोठी कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुजरात अहमदाबादमधील कालूपूरमध्ये २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहसीन पूनावाला असं या आरोपीचं नाव असून गुजरात एटीएसने वानवडी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता.२४) रात्री उशिरा वानवडी येथील राहत्या घरातून अटक केली. 

सोळा वर्ष फरार असलेला अब्दुल गाजी गुजरात एटीएसच्या हाती लागल्यानंतर मोहसीनची माहिती पुढे आली होती. त्यानंतर गुजरात एटीएसने ही कारवाई केली. हा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी आयएसआयला गाजी आणि मोहसिन यांनी मदत केली होती आणि देशविघातक कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी मोहसीनने पुण्यात अनेक घरे बदलली होती. तसेच तो खूप कमी वेळा घराबाहेर पडायचा. घराजवळच असलेल्या मदरशामध्ये तो शिकवणी घ्यायचा. तसेच दहशतवादाचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो पाकिस्तानमध्येही जाऊन आला होता. 

१९ फेब्रुवारी २००६ रोजी कालूपूर रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहसीन हा या प्रकरणी अटक झालेला तेरावा आरोपी आहे, तर १० आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT