पुणे

Video : हडपसरच्या आजी झाल्या जगात फेमस; मदतीसाठी अक्षरशः लागली रीघ

सकाळ वृत्तसेवा

हडपसर (पुणे) : गोसावीवस्ती येथील डोंबारी खेळ करणाऱ्या शांताबाई पवार (वय ८५) यांचा दांडपट्टा खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ देश-विदेशात व्हारयल झाला असून, त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यांचा व्हिडिओ पाहून लोकांकडून त्यांना मदतीसाठी फोन येत आहेत. अभिनेता रितेश देशमुखसह अनेक व्यक्तींनी आजींच्या कार्याचे कौतुक केले आहे. तर काही लोक घरी येऊन मदत करीत आहेत. अनेकांनी त्यांच्या नातवांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. सहकारनगर येथे राहणाऱ्या एैश्वर्या काळे यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यांचा खडतर जीवन प्रवास धडधाकट लोकांसाठीदेखील प्रेरणादायी ठरला आहे.

शांताबाई म्हणाल्या, "ऐश्वर्या काळे यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकले. ती माझ्या मुलीसारखी असून, तिचे मी ऋण कधीही विसरू शकणार नाही. मी दहा अनाथ मुलांची जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळत आहे." शांताबाईंचा नातू बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याची फी भरता न आल्याने त्याचे पुढील शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षापासून डोंबारी खेळ करायला सुरुवात केली. लग्न होईपर्यंत आई-वडिलांसोबत त्यांनी खूप ठिकाणी डोंबारी खेळ केले. लग्नानंतर त्यांनी खेळ करणे बंद केले. मात्र, काही दिवसातच पतीचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी शांताबाईंवर पडली. त्यातूनच पुन्हा त्यांनी डोंबारी खेळ सुरू केला. त्या जागोजागी साहसी खेळांची प्रात्याक्षिक सादर करून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवीत आहेत. तसेच, या कलेच्या माध्यमातून त्यांची आपल्या नातवांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यांची नातवंडेदेखील त्यांना या खेळात मदत करत आहेत. उतारवयातदेखील त्या शहरात व विविध गावात त्या आपला खेळ सादर करत आहेत.

शांताबाई केवळ दुसरी शिकलेल्या आहेत. त्या लेझीम आणि दांडपट्टा, असे खेळही सादर करतात. विशेष बाब म्हणजे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातूनही आपली कला सादर केली आहे. तरुणांनाही लाजवेल, असा उत्साह त्याच्यात दिसतो. डोंबारी खेळाने त्यांना आधार दिला. त्यातूनच त्या कुटुंबाला आधार देत आहे. मुलांबरोबरच मुलींना देखील शिकवले पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. आत्मविश्वास आणि ऊर्जा असेल, तर आयुष्यात आपण खूप काही करू शकतो, हे शांताबाईंचा जीवन प्रवासातून समजते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जगणे किंवा मरणे आपल्या हातात नसते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही व्यासपीठावर कला सादर करण्याची मी संधी साधते. सिनेमांमध्ये काम करताना वेगळा अनुभव मिळाला. डोंबारी खेळ करण्याच्या कलेसोबत गाणी म्हणणे हा देखील माझा छंद आहे. डोंबारी समाजातील बहुतांश लोकांना जन्माचे गावं नाही, घराचा पत्ता नाही, मतदान नाही, आधारकार्ड नाही, रहिवासाचा पुरावा नाही, शिक्षण नाही अशी अवस्था आमच्या समाजाची आहे. भटक्या जमातींपैकी एक असलेल्या 'डोंबारी' समाजाची दखल माय-बाप शासनाने घ्यायला हवी, अशी अपेक्षा शांताबाईंनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT