Half an hour of hailstorms cost farmers loss Team Esakal
पुणे

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; गारांसह पावसाने लाखोंचे नुकसान

अर्धातासाच्या गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

युनूस तांबोळी

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे बुधवार ( ता. 14 ) सायंकाळी चार च्या दरम्यान अर्धातास झालेल्या गारांच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे शेत मालाला खप नाही त्यात कमी बाजारभावामुळे वैतागलेला शेतकरी अस्मानी संकटाने हवालदिल झाला आहे. अर्धातासात लाखो रूपायाच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.

गणेगाव ( ता. शिरूर ) येथे शेतकरी माणिकराव बांगर यांनी किंग शुगर जातीची साडेतीन एकर मध्ये कलिंगडाची लागवड केली होती. यासाठी त्यांनी जवळपास 4 लाख रूपये खर्च केला होता. अगदी सात दिवसाने कलींगडाची विक्री बाजारपेठेत होणार होती. कलिंगड विक्रितून त्यांना जवळपास 15 लाख रूपये नफा झाला असता. मात्र गारांने कलिंगडाचे पिक झोडपून काढले असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. येथील गणेश जालिंदर बांगर यांनी 300 किलो मेथी ची अडीच एकरात टाकली होती. स्पिंक्लर ने पाणी व्यवस्थापन करून अगदी पाच दिवसात बाजारपेठेत ही मेथी जाणार होती. मात्र गाराच्या पावसाने पुर्ण क्षेत्र झोडपून काढल्याने 2 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

येथील घनेश सिताराम बडदे यांनी एक एकर क्षेत्रावर मेथी टाकली होती. त्यासाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केला होता. त्यांच्या या क्षेत्रात गारांच्या माऱ्यामुळे नुकसान झाले असून शेतात पाणी साठले असल्याने पुर्ण मेथी सडून जाणार आहे. पोपट नाथु येळवंडे या शेतकऱ्यांचे 20 गुंठ्याच्या मेथीचे नुकसान झाले आहे.

गणेगाव ( ता. शिरूर ) येथे गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. या बाबत माहिती घेत आहे. मात्र कृषी विभागाच्या वरीष्टांचा आदेश आल्याशिवाय पंचनामा करू शकणार नसल्याचे कृषी सहाय्यक अनिल देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT