Half of the dam at Bhima Valley is 100 percent full 
पुणे

भीमा खोऱ्यातील निम्मी धरणे काठोकाठ; वाचा कोणत्या धरणात किती आहे पाणीसाठा?

सकाळवृत्तसेवा

पुणे : भीमा खोऱ्यातील 26 धरणांपैकी निम्मी 13 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. नऊ धरणांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा तर, उर्वरित चार धरणांमध्ये 40 ते 80 टक्के पाणीसाठा झाला आहे.

करु का अजितदादांना फोन; प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण

भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून सध्या 11 हजार 704 क्‍युसेक आणि उजवा मुठा कालव्यातून एक हजार 54 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत 9.95 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. 

शंभर टक्के भरलेली धरणे (पाणीसाठा टीएमसीमध्ये) :

वरसगाव 12.82  
पानशेत 10.65     
खडकवासला 1.97 
कळमोडी 1.51 
चासकमान 7.57
आंद्रा 2.92
मुळशी 18.46
गुंजवणी 3.69
नीरा देवघर 11.73
भाटघर 23.50
वीर 9.41
नाझरे 0.59
पवना 8.50

भरण्याच्या मार्गावर असलेली धरणे, पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) : 
उजनी 52.75  (98.45)
टेमघर 3.44   (92.84)
भामा आसखेड 6.90   (90)
डिंभे 12.13   (97.11)
घोड 4.55   (93.33)
वडज 1.15   (97.98)
वडिवळे 0.99   (92.14)
कासारसाई 0.56   (98.69)
येडगाव 1.74   (90)

उर्वरित धरणातील साठा :
पिंपळगाव जोगे 1.48   (38)
माणिकडोह 4.19   (41)
विसापूर 0.52   (58)
चिल्हेवाडी 0.63   (79)

धरण क्षेत्रात पाऊस :
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल रात्रीतून 37 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव 41 मिमी, पानशेत 48 मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 11 मिमी पावसाची नोंद झाली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT