Lady-Ramabai-Hall
Lady-Ramabai-Hall 
पुणे

पुण्यात ऐतिहासिक वारसा असलेले हे सभागृह आजपासून होणार खुले

संतोष शाळिग्राम

पुणे - महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती आणि भाषणे ‘लेडी रमाबाई हॉल’ने अनुभवली. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील ऐतिहासिक वारसा असलेल्या या सभागृहाचे रुपडे पूर्णपणे बदलून गेले आहे. जुन्या-नव्या स्थापत्य रचनेच्या संगमातून बदललेले हे सभागृह आज खुले होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या सभागृहाची पायाभरणी भोर संस्थानचे श्रीमंत बाबासाहेब पंत यांच्या हस्ते दहा डिसेंबर १९३२ रोजी झाली. त्याचे उद्‌घाटन १३ जून १९३३ मध्ये आर. पी. मसानी यांच्या हस्ते झाले होते. त्याला पूर्वी ॲसेंब्ली हॉल म्हणत. पुढे वर्षभराने त्या सभागृहावर एक मजला चढविण्यात आला. जमखिंडीच्या राणी लेडी रमाबाई पटवर्धन यांनी या सभागृहासाठी त्यावेळी १२ हजार ५०० रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर २७ मार्च रोजी या सभागृहाला ‘लेडी रमाबाई’ (देवी रमाबाई) हे नाव देण्यात आले. 

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य जयंत किराड याबाबत म्हणाले, ‘‘महाविद्यालयातील या सभागृहाला मोठा वारसा आहे. अनेक दिग्गजांची भाषणे इथे झाली. त्यात आधुनिक सुविधा आणायच्या असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यात आले. ही वास्तू ऐतिहासिक असल्याने संबंधित विभागाकडून सर्व मान्यता घेऊन बदल करण्यात आले आहेत. ही वास्तू वातानुकूलित, एकॉस्टिक आणि कोणताही कार्यक्रम सादर करता येईल, अशी करण्यात आली आहे.’’

दिग्गजांची उपस्थिती 
सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. व्ही. रामन, सर विश्‍वेश्‍वरय्या, मोरारजी देसाई, डॉ. रा. गो. भांडारकर, विनोबा भावे, ॲनी बेझंट, मौलाना आझाद, धोंडो केशव कर्वे, सी. डी. देशमुख, दत्तो वामन पोतदार, श्रीमंत सर परशुरामभाऊ पटवर्धन, रॅंग्लर र. पु. परांजपे, धनंजयराव गाडगीळ, अच्युतराव पटवर्धन, लोकनायक, मा. श्री. अणे, जनरल करिअप्पा, डॉ. सरोजिनी नायडू, डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य, बॅरिस्टर जयकर, सोनोपंत दांडेकर यांसह विविध केंद्रीय मंत्री आणि अभिनेता यांच्या उपस्थितीत या सभागृहात कार्यक्रम झाले आहेत.

जुनी बाह्यरचना कायम ठेवताना या सभागृहाच्या आतील भागात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आता त्याची आसन क्षमता २९२ आहे. आगप्रतिबंधक व्यवस्था आणि त्यासाठी ८० हजार लिटर पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, जनरेटर सेट बसविण्यात आला आहे.
- जयंत किराड, सदस्य, शि. प्र. मंडळी

ऐतिहासिक असलेली ही वास्तू सर्व सुविधायुक्त असेल. त्याच्या नव्या रुपासाठी भरत शहा आणि कुटुंबीयांनी मोठे योगदान दिले. शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थी प्रशिक्षण, तज्ज्ञ, उद्योजकांची भाषणे आणि महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमांसाठी या सभागृहाचा वापर होईल.
- ॲड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT