Telegram sakal
पुणे

पोलिस आयुक्ताच्या टेलिग्रामवर पाठविल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रिका

टीईटी गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या असलेल्या एका आरोपीने याच्या मोबाईलमध्ये पोलिस आयुक्त नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर टेलिग्राम अ‍ॅपद्वारे १२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रिका पाठविल्या असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आले आहे.आनंद भारत डोंगरे (वय २७, रा. फुरसुंगी, मुळ रा.सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण १९ जणांना अटक करण्यात आली आहे. डोंगरे याला ३१ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.(TET Exam)

त्याला न्यायालयाने चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. डोंगरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना मंगळवारी (ता. ४) न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेला नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी प्रकाश मिसाळ याला एका मोबार्इल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. तो क्रमांक डोंगरे याच्या मोबाईलमध्ये सर्च केला असता तो पोलिस कमिशनर या नावाने सेव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत विचारणा केली असता त्याची उत्तरे देण्यास तो टाळाटाळ करत आहे. आरोपीच्या मोबाईलच्या रिओपन पंचनाम्यामध्ये सहआरोपींच्या मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या नावाने सेव्ह केल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्याने यास्वरुपाचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा असल्याने तसेच संबंधित नंबर नेमका कोणाचा आहे याचा तपास करायचा आहे. त्यामुळे डोंगरे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील करीत आहेत.(Pune news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT