rose sakal
पुणे

गुलाब शेतीला पुन्हा सुगीचे दिवस

सण-उत्सव रद्द झाले. हंगाम न मिळाल्याने फूल उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमुळे गेल्या दीड वर्षांपासून निर्बंधांच्या कचाट्यात अडकलेल्या फुलबाजाराला आगामी सणासुदीच्या दिवसांमुळे पुन्हा सुगीचे दिवस येतील, अशी आशा फूल उत्पादकांमध्ये पल्लवित झाली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी मार्चपासून लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले. फुले विकणे शक्य नसल्यामुळे ती फेकून द्यावी लागली. लग्न समारंभही साध्या पद्धतीने होऊ लागले. मंदिरे बंद झाल्याने अधिक गंभीर स्थिती झाली. त्यामुळे काहींना फूल शेती बंद करावी लागली. त्यातच गावोगावच्या यात्रा-जत्रा बंद झाल्या. सण-उत्सव रद्द झाले. हंगाम न मिळाल्याने फूल उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागला.

फुलांचे उत्पादन तर निघत होते. मात्र, विकणे शक्य नव्हते. एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याने चिंतेत असणाऱ्या फूल उत्पादकांवर लॉकडाउनमुळे मोठा फटका बसला. अनेकांचे हप्त्यांचे गणित बिघडले. दरवर्षी ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या निमित्ताने पुणे परिसरातून किमान दोन कोटी गुलाबाची युरोपीय देशांत निर्यात होते. देशातील अनेक बाजारपेठांत पुणे परिसरातून वर्षभरात सुमारे ७० ते ८० लाख फुले निर्यात होतात. कोरोनामुळे निर्यातीला बंदी असल्याने पुणे परिसरातील १०० ते १५० एकराची फूलशेती ठप्प झाली आहे. व्यापारी शरद कदम म्हणाले, की जून-जुलैनंतर बाहेरच्या राज्यांमधून फुलांची मागणी वाढली; परंतु काही फूल शेतीचे प्रकल्प बंद असल्याने फुलांचे दर वाढले. प्रत्येक दिवशी दर कमी-जास्त होतात. फुलांचा दर्जा आणि मागणीनुसार दर बदलतात. लॉकडाउनमध्ये शिथिलता कायम राहिली तर नक्कीच फूल उत्पादकांना चांगला फायदा होईल.

एक एकर पॉलिहाउससाठी महिन्याला दीड लाख रुपये खर्च येतो. जर उत्पादन काढणे थांबवले तर फुले खराब होतात. आता नियमांत शिथिलता आल्याने फुलशेतीला चांगले दिवस येतील. परंतु, पुन्हा जर लॉकडाउन लागला तर ७० टक्के शेतकरी फूल शेती बंद करतील, असे पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी सांगितले.

फुलशेतीमध्ये परवडत नसल्याने उत्पादकांनी दुसरे व्यवसाय करण्यास सुरुवात केली. परंतु, आता शिथिलता आल्याने गेल्या दीड वर्षांपासून झालेले नुकसान भरून निघेल आणि फुलशेतीला चांगले दिवस येतील, अशी आशा आहे. त्यामुळे दुसऱ्या पिकाकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा फुलशेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

- सोमनाथ तांबे: फूल उत्पादक शेतकरी,वडगाव मावळ

1.भारत, चीन, कोलंबिया, केनिया, मेक्सिको

गुलाबाचे उत्पादन करणारे देश

2.नेदरलँड्स, केनिया, इथिओपिया, बेल्जियम, कोलंबिया

गुलाब निर्यात करणारे प्रमुख देश

3.पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड

गुलाबाचे उत्पादन करणारी राज्ये

4.मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, कोलकता

महाराष्ट्रातून या राज्यात जातात फुले

(जर्नल ऑफ फॉर्माकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री २०१९ या अहवालात दिलेल्या माहितीनुसार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT