हार्वेस्टर.
हार्वेस्टर. sakal
पुणे

पुणे : मळणीसाठी ‘हार्वेस्टर’चा बोलबाला!

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : पंजाब, हरियानाच्या धर्तीवर आता राज्यातही नव्या बहुउपयोगी अजस्र ‘हार्वेस्टर’चे (मळणी यंत्र) आगमन झाले आहे. मात्र, यामुळे छोटेखानी मळणी यंत्र (हालर/उफणर) चालविणारे व्यावसायिक व मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र, या यंत्रामुळे मळणीचे काम कमी वेळेत होत असल्याने शेतकऱ्यांकडून त्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

चाळीस वर्षांपूर्वी शेतकरी शेतात खळे तयार करून त्यावरून अनेक दिवस बैल गोलाकार फिरवायचे. मग उफणून धान्य आणि काडीकचरा बाजूला काढायचा. १९८० नंतर खळे संपले आणि डिझेल इंजिनवर चालणाऱ्या हालर या छोट्या मळणी यंत्राने शेतकऱ्यांची मळणी सुखकर केली. गेली चाळीस वर्ष हालरची मक्तेदारी होती. सुगीच्या दिवसात पावसाच्या आत धान्य भरडून घरात थप्पी लावण्यासाठी घाई उठायची. यासाठी हालरवाल्याकडे शेतकरी रांगा लावायचा. हालरवाल्यांनी कधीही या घाईत शेतकऱ्यांना नडवून जादा पैसे उकळले नाहीत.

मागील पाच-सहा वर्षांपूर्वीपासून पंजाब, हरियानाची गहू काढणी संपली की, तेथील लोक हार्वेस्टर घेऊन महाराष्ट्रात गहू काढणीच्या हंगामात येत आहेत. त्यांचा दरही हालरपेक्षा पोत्यामागे पन्नास रुपये कमी आहे. दीड ते दोन एकरच्या मळणीसाठी (पंचवीस-तीस हालरला एक दिवस लागतो. तेच काम हार्वेस्टर तासात करतो. शिवाय हालरसाठी गहू काढावा लागायचा तो खर्च वेगळाच. हार्वेस्टर शेतातील उभा गहू पोटात घेऊन कचरा फेकून धान्याचे संचयन करतो. त्यामुळे मजुरांची गरज नाही. कमी खर्च व कमी वेळ यामुळे हार्वेस्टरचा बोलबाला झाला. मागील दोन वर्षांत काही स्थानिक शेतकऱ्यांनी अठरा ते वीस लाख रुपये मोजून हार्वेस्टर घेतले आणि चालवायलाही शिकले

. सोमेश्वरनगर परिसरात सध्या गहू, सोयाबीन मळणारे पंधरा हार्वेस्टर आहेत. जिथे हा मोठा हार्वेस्टर जात नाही, तिथे ट्रॅक्टरला जोडून चालवता येणाऱ्या मध्यम व छोट्या हार्वेस्टरचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. ही यंत्रे तर सोयाबीन, गहू, हरभरा, तूर, मका, मूग, ज्वारी, साळ, बाजरी मळणारी बहुउपयोगी ठरत आहेत. या यंत्रांनी शेतकऱ्यांचा सुगीचा, मजूर शोधण्याचा व कष्टाचा ताण कमी केला, पण सुगीचा तारणहार असणारा हालरवाला आणि मजुरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांचा फायदा...

  • स्थानिक शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरची खरेदी

  • हालरपेक्षा पोत्यामागे दर पन्नास रुपयांनी कमी

  • दोन एकरची मळणी होते अवघ्या तासाभरात

  • शेतकऱ्यांच्या पीक खर्चातही होतेय बचत

  • गहू, सोयाबीन, हरभरा, ज्वारीची मळणी सुखकर

मी पंचवीस वर्षे हालर चालविला. तीन वर्षांत हालर निरुपयोगी झाला. अधूनमधून बाजरी भरडायला मिळायची. आता मिनी हार्वेस्टर बाजरीही करतो. दोन वर्षांत हालर भंगारात गेले. यामुळे हालरचालकांना अन्य व्यवसायाकडे वळावे लागत आहे.

- माणिक शिंदे, हालरचालक

शेतकऱ्यांना आता मळणीची वेगवान सेवा पाहिजे आहे. माझ्याकडे मध्यम आणि छोटे हार्वेस्टर असून ते बहुउपयोगी असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. एक तासात एकरावरील पिकाची मळणी हार्वेस्टरच्या माध्यमातून होत आहे.

- शेखर कोरडे, हार्वेस्टर मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT