Ritesh-Pawar 
पुणे

स्वतःला सावरत, धीर देत त्यांनी केली आत्मविश्‍सासाने कोरोनावर मात

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘लॉकडाउनचे संपूर्ण पालन केले... घरातून पण बाहेर पडलो नाही... सर्व काळजी घेऊनसुद्धा कोरोनाची लागण कशी झाली समजले नाही. मात्र या कठीण काळात परिवारासाठी स्वतःचा विश्वास कमी होऊ दिला नाही आणि कोरोनावर मात केली,’ अशी भावना कोरोनातून नुकतेच बरे झालेल्या रितेश पवार यांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रितेश यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब. जूनच्या ३० तारखेला त्यांची पत्नी अंजली पवार यांना ताप भरून आला. मात्र तो केवळ फ्लू असावा, अशी समजूत ठेवून त्यांनी फ्लूवरील उपचार सुरू ठेवले. चार दिवसांनी रितेश यांना देखील तीव्र ताप आल्यामुळे या दोघांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेतली. परंतु दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी तापावरील उपचार सुरू ठेवले. त्यामुळे पुन्हा कोविड चाचणी करण्याचे ठरवले. मात्र तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला.

संपूर्ण कुटुंबियांची चाचणी करण्यात आली व त्यात रितेश यांची दोन मुले आणि आई यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांचे वडील आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले. आई आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःला सावरत धीर देत त्यांनी या आजरावर मात केली व घरी आले. तर दोन दिवसांनी त्यांची पत्नी सुद्धा कोरोनातून मुक्त झाल्या. त्यांच्या वडिलांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे रितेश यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT