ghodegoan
ghodegoan 
पुणे

त्याला वाटलेले गावकरी तिरस्कार करतील, पण झाले फुलांच्या वर्षावात स्वागत 

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवासी असलेल्या गणेश गुलाब बेळे यांचे आपली अडीच महिन्याची ससून हॉस्पिटल येथील कोरोना वॉर्डमधील ड्युटी संपवून आज घोडेगाव येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थ व मित्रांनी त्याचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. ग्रामस्थांच्या या स्वागताने ते भारावून गेले होते.

घोडेगाव येथील न्यू इंडिया होटेल चौकात दुपारी साडेबारा वाजता गणेश बेळे यांचे दुचाकीवरून आगमन झाले. कोरोनाबाधित रुग्णांवर अतिदक्षता विभागात अधिपरिचारिक म्हणून ते गेली अडीच महिने ससून हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे ग्रामस्थ व मित्रांनी त्याचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. ग्रामस्थांच्या या स्वागताने ते भारावून गेले होते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

त्यांच्या स्वागतप्रसंगी सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, ग्राम विकास अधिकारी जनार्दन नाईकडे, वैभव मंडलिक, नीलेश जंगम, सनी कर्पे, भगवान भागवत, प्रशांत काळे, मुकुंद काळे, प्रशांत मंडलिक उपस्थित होते. 

माझ्या गावाने माझा तिरस्कार न करता फुलांचा वर्षाव आणि मनोभावे स्वागत केले. त्यामुळे खूप आनंद झाला, असे गणेश बेळे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT