bhatghar dam 
पुणे

अरे वा, भाटघर धरणात तरंगत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सेवा

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर तालुक्याच्या भाटघर धरण खोऱ्यातील अतिदुर्गम गावांमधील नागरिकांना धरणातील लॉंचमधील तरंगत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सेवा देण्यास राज्य सरकारच्या समितीच्या वतीने सुरुवात करण्यात आली. 

शनिवारी (ता. ५) वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन मालाजुरे यांच्या वैद्यकीय पथकाने लॉंचमधील या वर्षातील पहिली आरोग्य सेवा दिली. भाटघर धरणातील सांगवी वेखो, नानावळे, मळे, भांड्रवली, डेरे व भूतोंडे या गावांमधून ७२ रुग्णांना लॉंचमध्ये आरोग्य सेवा दिली. लॉंचमधील या वैद्यकीय पथकात श्रीमती एस. सी. मदने, कृष्णा किंद्रे व लॉंच ऑपरेटर राजेंद्र कंक आदी उपस्थित होते. लॉंचवरील फार्मासिस्टचे पद रिक्त आहे. त्यामुळे डॉक्टर व सिस्टर यांनाच रुग्णांना गोळ्या-औषधे द्यावी लागत आहेत.

भाटघर धरणातील या लॉंचमधील आरोग्यसेवा ही दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु होते. मात्र, या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे काही दिवस उशिरा लॉंच सुरु करण्यात आली. ऑगस्ट ते मार्च या आठ महिन्यांच्या कालावधीत हजारो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. लॉंचमधील तरंगत्या दवाखान्यातून आठवड्यातून बुधवारी व शनिवारी अशा दोन वेळा दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेत प्रत्येक वेळी सरासरी ९० ते १०० रुग्णांवर उपचार केले जात आहे. 

भाटघर धरण खोऱ्यातील १६ गावांमधील नागरिकांना आरोग्य सेवा घेण्यास इतरत्र कुठेही जाता येत नाही. त्यामुळे त्यांना केवळ याच लॉंचमधील दवाखान्याचा आधार मिळत आहे. धरण खोऱ्यातील चांदावणे, गुहिणी, खुलशी, भूतोंडे, डेरे, भाड्रवली, मळे-सुतारवाडी, नानावळे, बुरुडमाळ, सांगवी वेखो, वाघमाची, गोपे, घुमटवस्ती व कुंबळे या गावांमधील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT