PMC Pune  
पुणे

पुणे महापालिका हद्दीत गावे समाविष्टबाबत सुनावणी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याबाबत या गावांमधील जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य यांची सुनावणी सोमवारी जिल्हाधिकारी यांनी घेतली. आता जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. (Hearing completed regarding inclusion of villages in Pune Municipal Corporation

महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट करण्याबाबत यापूर्वी विभागीय आयुक्तांकडून नागरीकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी घेऊन आपल्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला आपला अहवाल यापूर्वीच सादर केला आहे. परंतु गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांचे म्हणणे विचारात घेणे आवश्‍यक असते.

सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची सुनावणी झाली. त्या सुनावणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात गावे समाविष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://fb.watch/6ggJ4mwafI/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT