Heavy rain with wind in Pune 
पुणे

पुण्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या शहरातील स्थिती

शरयू काकडे

पुणे : तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यामुळे पुण्यात पावसाने दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती दरम्यान आज(ता.19) पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तसेच मेघगर्जनेसह हलक्या सरींची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस म्हणजेच येत्या सोमवारपर्यंत (ता. २४) शहरात सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र असेल. मात्र काही प्रमाणात दुपारी किंवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे(Heavy rain with wind in Pune Know the situation in the city)

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुण्यात काही दिवसांपासून जोरदार वारे आणि पावसाचे सावट कायम होते. मात्र, वादळ गुजरातला पोचल्यानंतर आता प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले. सोमवार, मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली होती तर शहरात ढगाळ वातवरण होते. आज शहरातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

जाणून घ्या पुण्यातील कोणकोणत्या भागात काय आहे पावासाची स्थिती

  • खडकवासला, शिवणे, उत्तमनगर परिसरात पावसाला सुरुवात

  • रामटेकडी हडपसर भागात पावसाचे वातावरण, आकाशात काळे ढग जमा झाले

  • बाणेर बालेवाडी रिमझिम पावसाला सुरुवात

  • सिंहगड रस्त्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव धायरी, नऱ्हे भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

  • दत्तनगर आंबेगाव बुद्रुक परिसरात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. आंबेगाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

  • सातारा रस्ता, पद्मावती, सहकारनगर, धनकवडी, चव्हाणनगर,लक्ष्मी नगर इ. परिसरात मुसळधार पाऊस सुरू

  • कोथरूडमध्ये धुंवाधार पाऊस

  • गोखलेनगर मध्ये पावसाची संततधार सुरू

  • घोरपडी परिसरात जोरदार पाऊस

  • कोळेवाडी जांभूळवाडी परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT