Heavy rains in the area of ​​Khadakwasla Increased water storage in 24 hours
Heavy rains in the area of ​​Khadakwasla Increased water storage in 24 hours 
पुणे

खडकवासला परिसरात तुफान पाऊस; 24 तासांत वाढला पाणीसाठा

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून, गेल्या 24 तासांत पाणीसाठ्यात 2.11 अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात पुरेसा साठा झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अत्यल्प आहे. परंतु गेल्या 24 तासांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील या धरणांमध्ये पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पात आज बुधवारी सकाळपर्यंत 12.07 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. काल सकाळी आठ वाजेपर्यंत या धरणात प्रकल्पांमध्ये 9.96 टीएमसी पाणीसाठा होता.

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

धरणातील पाणीसाठा (कंसात मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये) : 
टेमघर 0.93 (170)
वरसगाव 5.05 (165)
पानशेत 5.09 (177)
खडकवासला 1.00 (68)


पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी साठा
गतवर्षी या प्रकल्पात 5 ऑगस्टअखेर 28.96 टीएमसी (99.32 टक्के) पाणीसाठा होता. परंतु यावर्षी 12.07 टीएमसी (41.40 टक्के) पाणीसाठा उपलब्‍ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT