rain
rain sakal media
पुणे

वादळी पावसाने आंबेगाव तालुक्यामध्ये मोठे नुकसान

नवनाथ भेके, निरगुडसर

निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील निरगुडसर, पांढरीवस्ती, खडकी, भराडी परीसरात रविवार (ता. ३०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमरास झालेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. शेती पिकात सर्वञ पाणी साचले तसेच पांढरीवस्ती वरील सिताराम तुकाराम बांगर यांच्या घरावरील पञे, कौले उडुन घरातील अन्न धान्यासह विविध वस्तुंचे नुकसान झाले.

रविवार (ता. ३०) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच कहर केला. सुमारे पाऊण तास पडलेल्या वादळी पावसाने शेतशिवार पाण्याने तुडुंब झाले. पावसामुळे वादळही असल्याने घरे, शेतजमिन, शेतीपिकांचे नुकसान झाले. निरगुडसर, भराडी, जवळे खडकी, पांढरीवस्ती आदी परीसरात वादळी पाऊस पडला.

पांढरीवस्ती परीसरात झालेल्या वादळी पावसाने वीजेच्या तारा तुटल्या. झाडे कोसळली तसेच सिताराम बांगर यांच्या पडवीवरील सहा पञे उडून बाजरी, गहु, तांदुळ असे एकुण नऊ कट्टे पावसाच्या पाण्यात भिजले. घरावरील कौले, ढापे उडून पावसाचे पाणी घरात आल्याने टिव्ही, फ्रिज आदी वस्तू पावसात भिजून नुकसान झाले. तुकाराम भिका बांगर घरावरील पत्रा कौले, सुंघदा किसन पोखरकर यांच्या घरावरील कौले, संतोष गंगाराम पोखरकर यांच्या घरावरील कौले, चंद्रकांत कुशाबा राक्षे यांच्या बराखी वरील पत्रे उडून नुकसान झाले. तरी प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन भरपाई अशी मागणी भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक बांगर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT