manchar rain 
पुणे

पावसाची दमदार बॅटिंग...खेड, आंबेगाव तालुक्याला दिलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंचर परिसरात दोन तासांत 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच, खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी परिसरातही जोरदार हजेरी लावली आहे.  

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात आज (ता. २५) सकाळी व दुपारी दोन तास मुसळधार पाऊस झाला. 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बसस्थानकासमोर असलेल्या पुणे- नाशिक रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे काही वेळ दुचाकी वाहनांची वाहतूक बंद पडली होती. सातगाव पठार भागात झालेल्या पावसाचा फायदा सात हजार एकर क्षेत्रातील बटाटा पिकाला झाला आहे.

दुपारी दोन ते साडेतीन यावेळात पाऊस झाला. चांडोली खुर्द, चांडोली बुद्रुक, पिंपळगाव, शेवाळवाडी, भोरमळा, तांबडेमळा या भागातही जोरदार पाऊस झाला. शेतात व अरणीमध्ये साठविलेल्या कांद्याला वाहत्या पाण्याचा फटका बसला. तसेच, फरशी, बीट, काकडी, वांगी या पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे हि पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती पंकज थोरात यांनी दिली.

अनेक शेतकऱ्यांनी शेतातून साचलेले पाणी काढण्यासाठी चर खोदण्याचे काम सुरु केले आहे. सातगाव पठार भागातील बटाटा पीक पावसाअभावी धोक्यात आले होते. पावसामुळे बटाटा पिकला जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती बटाटा उत्पादक शेतकरी राम तोडकर यांनी दिली. बटाटा उत्पादक शेतकरी अशोक बाजारे म्हणाले की, सातगाव पठार भागातील मुख्य पीक बटाटा आहे. पंधरा दिवसापासून बटाटा उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. काही जणांनी तर टॅंकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन सुरू केले होते. पण, आज झालेला पाऊस बटाटा पीक वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांचा टॅंकरच्या पाण्याचा खर्च वाचला आहे.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात आणि खेड तालुक्याच्या काही भागात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे श्रावणात आषाढधारांचा अनुभव आला. आज दिवसभर आकाश ढगाळ होते. संध्याकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली. सहाच्या सुमारास काळ्या ढगांच्या आकाशातल्या आच्छादनने अंधारून आले आणि साडेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर जोराचा वारा होता. मुसळधार पावसाच्या सरी बरसत होत्या. तासभरच पाऊस कोसळत होता, पण त्यात इतका जोर होता की, सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. सखल भागात तुडुंब पाणी साचले. राजगुरुनगरमधील रस्ते जलमय झाले. रस्त्यांवरची वाहतूक थांबली. जनजीवन एका तासात विस्कळीत झाले. छोट्या ओढ्या नाल्यांना पूर आले. तालुक्यातील विविध भागातही पाऊस कोसळल्या. 

आळंदी : आळंदी शहरात सायकाळी साडेपाचनंतर मुसळधार पाऊस पडला. श्रावणात पडलेल्या मोठ्या सरीने रस्त्यावर पाणी वाहु लागले. आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. आकाशात काळे ढग दाटून आले. तसेच, सुंदर इंद्रधनुष्य दिसत होते. सायंकाळी साडेपाचनंतर मात्र मुसळधार पाउस पडू लागला. रस्त्यावरुन पाणी वाहत होते. आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामार्फत ड्रेनेज लाईन फ्लॉप झाली. बरेच ठिकाणी पावसाचं ड्रेनेज पाणी जावं म्हणून कोट्यवधी खर्च रुपये खर्च करुन पाईपलाईन केली. प्रत्यक्षात योजनेचे तीनतेरा वाजले. पाईपलाईन एकीकडे आणि पावसाचे पाणी दुसरीकडे रस्त्यावर वाहत होते. ठिकठिकाणी पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. पावसामुळे शेतकरी वर्गात खुशी होती.

चाकण : खेड तालुक्यातील चाकण परिसरात गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी परिसरात हजेरी लावली. यामुळे परिसरातील पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भुईमूग, बाजरी, वाल, मूग, सोयाबीन या पिकांना या पाऊस फायदा झाला आहे. परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. तसेच रस्ते देखील जलमय झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT