KHED-SHIVAPAUR.jpg 
पुणे

पुणे-सातारा महामार्गाने फिरायला जाताय? मग ही बातमी हमखास वाचाच...

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर  : वीकएंडची संधी साधुन थर्टी फर्स्टसाठ साजरा करण्यासाठी नागरीक आज मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटर रांगा लागल्या असून प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महिन्याच्या चौथ्या शनिवारची सुट्टी साधुन नागरीक आज थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी आहे.

दरम्यान, त्यामुळेच या रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. टोल नाक्यावर सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल नाका ते कोंढणपूर फाट्यापर्यन्त वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. 

प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सुमारे अर्धा तास वेळ लागत आहे. गर्दीच्या वेळी टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी हाताळण्यासाठी टोल प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT