sarpanch 
पुणे

पुणे : दिघीच्या माजी सरपंचांनी केले असे की, सारे गाव घेतेय नाव

सकाळवृत्तसेवा

भोसरी : दिघी गावचे माजी सरपंच साहेबराव सहादु वाळके यांनी स्वतःच्या वयाच्या पंच्याहत्तरीचा अमृत महोत्सव साजरा न करता कोरोना व्हायरस लढ्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला एक लाख रुपयाचा धनादेश देत  आदर्श निर्माण केला आहे.

दिघीगावचे माजी सरपंच साहेबराव सहादू वाळके यांचा जून महिन्यात अमृतमहोत्सव साजरा होणार होता. देश आणि राज्य कोरोनाशी लढा देत आहे. त्यामुळे राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.  माजी सरपंच वाळके यांनी अमृत महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा खर्च टाळत एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहेत. याबद्दल वाळके यांचे कौतुक होत आहे.

साहेबराव सहादु वाळके हे दिघीगावच्या अठरा वर्षे सरपंचपदी होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एक गांव एक पाणवटा, एक गांव एक स्मशान भूमी असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांना या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने मानाचा फेटा भेट देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी दिघीतील पंचशील बुध्द विहारास स्वतःच्या मालकीची जागा दिली. त्याचप्रमाणे भोसरी दिघी रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वे नंबर 72 मधील सोळा गुंठे जागाही महापालिकेला दिली.

जून महिन्यात त्यांच्या वयाच्या पंचाहत्तरीनिमित्त अमृतमहोत्सव साजरा होणार होता. देश आणि राज्य कोरोनाशी लढा देत आहे. त्यामुळे राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.  माजी सरपंच वाळके यांनी अमृत महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा खर्च टाळत एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहेत. याबद्दल वाळके यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT