hand 
पुणे

कोकणच्या मदतीला धावली मुळशीतील तरुणाई  

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे निसर्ग वादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, मंदिर, विजेचे खांब व परिसराचे नुकसान झाले. येथील लोकांचे संसार उद्धवस्त झाले. या नागरिकांनी आपले संसार पुन्हा उभे करावेत, यासाठी हातभार म्हणून मुळशी तालुक्यातील भूगाव येथील तरुणाईने मदतीचा हात दिला.     

श्रीवर्धन परिसरातील बरेचशे नागरिक हे पर्यटनावर अवलंबून आहेत. परंतु लाॅकडाउनमुळे एेन सुटीच्या काळात पर्यटक फिरकले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यात निसर्ग वादळामुळे  परिस्थिती अतिशय भयाण झाली आहे. अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या. घरांचे छप्पर वादळात उडून गेले आहे. धरणीची उशी आणि आभाळाचे पांघरूण घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

मुळशीतील तरुण मंडळी अनेक वेळा श्रीवर्धन परिसरात जात असतात. त्यातून येथील अनेकांशी त्यांचे भावनिक नाते जोडले गेलेले आहे. त्यांनी या कुटुंबांचे सुरू असलेले हाल बातम्यांमधून पाहिले. त्यामुळे या नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोशल मिडियावर मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यातून जमा झालेली मदत नुकतीच वाटप करण्यात आली. यामध्ये ७० कुटुंबांना तांदुळ, डाळ आणि अनेक अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेष म्हणजे चक्रीवादळाने वीज पुरवठा यंत्रणेचे नुकसान झाल्यामुळे या परिसरातील गावात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे तातडीने गरज म्हणून ६०० बॅटरी टॉर्च, १२ हजार मेणबत्ती, १२०० माचीस बॉक्स यांचे वाटप करण्यात आले. 

माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली भावे हायस्कुल ग्रुप, राहुल इंगवले, विशाल सुर्वे, मयुर सणस, विनोद साळुंके, शरद इंगळे, प्रशांत इंगवले, मंगेश जाधव, जितेंद्र इंगवले यांनी या मदतीसाठी पुढाकार घेतला. तसेच, या मदतीचे थेट श्रीवर्धनला पोचलून वाटप केले.  

अनेकवेळा भूगावमधील तरुण श्रीवर्धनला फिरायला जातात. त्यांना श्रीवर्धनवासीय मायेचा आसरा देतात. त्याचीच जाणिव ठेऊन ही मदत केली, असे भूगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र इंगवले यांनी सांगीतले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT