mask.jpg 
पुणे

घरकाम करणाऱ्या मावशींच्या मदतीला धावला मुळशी पॅटर्न

रीना महामुनी- पतंगे

धनकवडी (पुणे) :  घरोघरी धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मावशींना लॉकडाऊनमध्ये सक्तीने घरी बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांना गैरहजेरीचा पगार दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. "आमचं काम थांबवू नकासा बगा... आता काय काम बी मिळायचं नाय अन् मग खायाचं तर काय " असा उद्विग्न सवाल घरेलू काम करणाऱ्या मावशी विचारत होत्या. त्यांची आर्त हाक ऐकून मुळशी पॅटर्न चित्रपट निर्माते अभिजीत भोसले गरजू मावशींच्या मदतीला धावून आले आहेत.

 अभिजीत भोसले, शुभम शिंदे, अजिंक्य भोसले आणि अर्णव नलावडे या चार तरुणांनी घरकाम करणाऱ्या मावशींसह इतर ३५ ते ४० गरजू महिलांना मास्क बनविण्याचे काम देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी गरजू महिलांना मास्क बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांच्याकडून मास्कची निर्मिती करून घेतली आहे. तयार केलेले मास्क शहरातील आसपासच्या औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांना विकण्यात येत असून सर्व प्रक्रियेत महिलाच कार्यरत असल्याने त्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्यास मोठा हातभार लागत आहे.   
 आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली


लॉकडाऊनच्या काळात आमच्याकडे काम करणार्‍या मावशींचे मदतीसाठी फोन आले होते. सुरुवातीला  त्यांना आर्थिक मदत केली पण मी बांधकाम क्षेत्रात आणि  सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आमचेही काम बंद होते. महिलांना आर्थिक मदत करण्याला मर्यादा येत होत्या. त्यामुळे मास्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार आणि प्रशासन काम करत असताना आपणही महिलांना मदत करण्याची साखळी वाढविण्याच्या हेतूने मास्क निर्मितीचे काम हाती घेतल्याचे शुभमने सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिजित म्हणाले," जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू. एच.ओ.) कापसाचे मास्क कोरोनाला रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितल्याने  १०० टक्के कॉटनचे मास्क बनविण्याचे ठरवले. त्यासाठी डॉक्टरांचाही सल्ला घेतला. आमच्या मावशींबरोबरंच इतर गरजू महिलांशी संपर्क साधून त्यांना हे मास्क घरच्या घरी शिवण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण देऊन मास्क निर्मितीचे काम सुरू केले. सध्या अनलाॅक जरी झाले असले तरी कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे शहरातून या मास्कला मागणी आहे. आता परराज्यातून सुद्धा हे मास्क मागितले जात आहेत. सध्या ४० महिला मास्क शिवण्याचे काम  करत आहे. 

लॉकडाऊनपूर्वी घरकाम करत होते. मात्र , कोरोनामुळे मागच्या चार महिन्यात घरी बसायची वेळ आली होती. घरीच मास्क बनविण्याचे काम करून पैसे मिळत आहेत. घरगाडा सुरु असल्याचे समाधान आहे. आतापर्यंत एक हजार मास्क शिवून विकले आहेत. आता तर या मास्कला इतकी मागणी वाढलीय की, इतर गरजू बायकांनाही मी याबद्दल सांगत आहे.
- गीता चौगुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT