उरुळी कांचन (पुणे) : हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीच्या हेमलता बाळासाहेब बडेकर यांची बहुमताने निवड़ झाली आहे. हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत, हेमलता बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा सोळा विरुध्द तीन अशा मोठ्या फरकाने पराभाव केला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे हवेली पंचायत समितीचे यापुर्वीचे उपसभापती युंगधर उर्फ सनी मोहन काळभोर यांनी एक महिण्यापुर्वी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपसभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली.
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बडेकर यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघाऱी घेण्याच्या निर्धारीत वेळेत दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने, मतदान घेण्यात आले. यात हेमलता बडेकर यांना सोळा तर अनिरुध्द यादव यांना तीन मते मिळाली. यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
हवेली पंचायत समितीमध्ये सध्या विस पंचायत समिती सदस्य आहेत. तर अंजिक्य घुले यांचे निधन झाल्याने, एक जागा रिक्त आहे. विसपैकी राष्ट्रवादी कॉग्रेसचे 10 सदस्य आहेत. तर शिवसेनेचे सहा व भारतीय जनता पक्षाचे तीन सदस्य आहेत. राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने, हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीच्य़ा माध्यमातुन हेमलता बडेकर यांच्या रुपाने एकच उमेदवार दिला होता. तर भारतीय जनता पक्षाने अनिरुध्द यादव यांना निवडणुकीच्या रिंगनात उतरवले होते. यामुळे हेमलता बडेकर व अनिरुद्द यादव यांच्यात झालेल्या लढतीत हेमलता बडेकर यांनी सोळा विरुध्द तीन अशा मोठ्या फरकाने बाजी मारली आहे.
दरम्यान उपसभापतीपदी विराजमान होताच, आमदार अशोक पवार यांच्या हस्ते हेमलता बडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सामाजिक व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, माजी उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, माजी जिल्हा परीषद सदस्य रमेश कोंडे, रमेश मेमाने उपस्थित होते.
आमदार अशोक पवार यांची पुन्हा एकदा बाजी..
हेमलता बडेकर या शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्या कट्टर समर्थक असून, उरुळी कांचन-शिंदवने या गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. दहा महिण्यापुर्वी उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही अशोक पवार यांनी आपलेच कट्टर समर्थक सनी काळभोर यांना उपसभापती करुन, हवेलीवर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले होते. सनी काळभोर यांचा उपसभापतीपदाचा दहा महिण्यांचा कालावधी पुर्ण होताच, त्यांना राजीनामा देण्यास सांगून उपसभापतीपदी आपल्याच दुसऱ्या कट्टर समर्थकाला उपसभापती बनवले आहे. यातून पवार यांनी विरोधकांना व पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना शिरुर व हवेलीचेही आपणच बॉस असल्याचा इशारा दिला आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.