yedgav dam 
पुणे

कुकडी प्रकल्पातून आवर्तनाच्या या आहेत तारखा... 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून मीना शाखा, घोड शाखा व पिंपळगाव जोगा या कालव्यात उन्हाळी हंगामातील दुसरे अवर्तन सोडण्यात आले आहे. 26 दिवसांच्या या आवर्तनात प्रत्यक्ष सिंचनासाठी दोन टीएमसी पाणी वापर होणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे या धरणांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ३०.५४ टीएमसी आहे. प्रकल्पात आजअखेर ४.४३१ टीएमसी (१४.४३१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजअखेर प्रकल्पात ०.२६५ टीएमसी (०.८९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

कडूसकर यांनी सांगितले की, उन्हाळी पहिले आवर्तन १० मार्च ते ५ मे दरम्यान सुरू होते. या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी झाला. २९ एप्रिल रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्यात कुकडी डावा व डिंभे उजवा कालवा वगळता इतर कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मीना शाखा, घोड शाखा व पिंपळगाव जोगा या कालव्यात कुकडी प्रकल्पातील धरणांतून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. मीना शाखा, घोड शाखा व पिंपळगाव जोगा या कालव्याचे आवर्तन अनुक्रमे ५ जून, १५ जून, ४ जून रोजी पूर्ण होईल. या वर्षी आवर्तन नियोजन काटेकोर केल्यामुळे सुमारे एक टीएमसी पाण्याची बचत झाली आहे.

धरणनिहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) व कंसात टक्केवारी : येडगाव : ०.२२७ (११.७२ टक्के), माणिकडोह : ०.७५२ (७.३९), वडज : ०.१९४ (१६.६२), डिंभे : ३.२५ (२६.०६), पिंपळगाव जोगे : उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के, मृत साठा ४.२ टीएमसी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT