Students_Engineering 
पुणे

यंदा इंजिनीअरिंगला प्रवेश वाढणार; नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना'मुळे यंदा प्रवेश होणार की नाही यामुळे अनेक संस्थांना चिंतेने ग्रासलेले आहे. अशातच राज्य सरकारने मात्र अभियांत्रिकीसह इतर तांत्रिक अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे रिक्त जागा राहण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 

विज्ञान शाखेचे विद्यार्थी इयत्ता १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंग, फार्मसी, यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत.

यंदा कोरोनामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'सीईटी' परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे यंदा प्रवेश प्रकियाही लांबणीवर पडणार आहे. तसेच पालक विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी पाठविण्याची शक्यता कमी आहे. 

अशा स्थितीत अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांचा प्रश्न निर्माण होणार आहे. यावर तोडगा म्हणून प्रवेश वाढविण्यासाठी उच्चतंत्र शिक्षण विभागात हालचाली सुरू आहेत. याबाबत या खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी "राज्यातील अभियांत्रिकी व इतर तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रवेश पात्रता व नियम यामध्ये लवकरच सुधारणा करण्यात येतील. यामुळे राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राज्यातच शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल." असे ट्विट करून यासंदर्भात सुतोवाच केले आहेत. उच्चतंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

"अभियांत्रिकी प्रवेश घेण्यासाठी 'फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ (पीसीएम) या तीन विषयात १२वीला किमान खुल्या गटात १५० गुणांची तर आरक्षीत गटासाठी १३५ आवश्यकता आहे. त्याऐवजी ही अट अनुक्रमे १३५ व १२० गुणांची केली जाऊ शकते. कोरोनाच्या निमित्ताने शासकीय पातळीवर विचार सुरू आहे. यामुळे अभियांत्रिकीचे प्रथम वर्षाचे वाढतील."

- डाॅ. शामकांत देशमुख, कार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

प्रवेश वाढणार पण पात्रतेचे काय? 
अभियांत्रिकीसह इतर तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमात शिथिलता आणली जाणार असल्याने संस्थांमध्ये प्रवेश वाढून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, हे विद्यार्थी प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन शेवटच्या वर्षापर्यंत जातील का? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे. यापूर्वी राजेश टोपे हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असतानाही 'पीसीएम', पीसीबी ग्रुपमध्ये शिथिलता आणून प्रवेश दिल् होते. मात्र, यातील अनेक विद्यार्थी प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाले असे जाणकारांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील २०१९-२० प्रवेश स्थिती :- 

पदवी संस्था संख्या क्षमता रिक्त जागा रिक्त टक्के
आर्किटेक्ट ३५ २२१० ९१२ ४१.२७
अभियांत्रिकी १२२ ५०५३७ १९९९६ ३९.५७
बी फार्मसी ८३ ६३४० ९१९ १४.५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT