Corona-Patient-Pune
Corona-Patient-Pune 
पुणे

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशातील १३ टक्के कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरीही त्यातील पुण्यातील आतापर्यंतचा सर्वांत कमी मृत्युदर असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. देशात सद्यःस्थितीत दोन लाख ६८ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ६२ टक्के म्हणजे एक लाख ६६ हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या खालोखाल केरळमध्ये ९.४ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशाच्या तुलनेत १३ टक्के आणि राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत २१ टक्के (३५ हजार ५३९) रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने प्रसिद्ध केली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी १७ सप्टेंबर ८१ हजार ५४० रुग्ण होते. ती संख्या ११ फेब्रुवारीपर्यंत चार हजार ५८७ पर्यंत कमी झाली होती. महिन्याभरात कोरोनाबाधित रुग्णांचे पुन्हा निदान होऊ लागले आहे. त्यामुळे येथील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षणही खात्याने नोंदविले आहे. कोरोनबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरीही त्याचा सर्वांत कमी मृत्यूदर आता आहे. जिल्ह्यात ११ एप्रिलला मृत्यूदर १०.५ टक्के होता. तो आता १.८ टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. 

अत्यवस्थ होऊन उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्या बहुतांश रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात. त्यातूनही सहव्याधी असलेल्या रुग्णांना झालेल्या संसर्गाचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेत प्रभावी उपचार करता येतात. तसेच, रुग्णाला कोणत्या टप्प्यावर नेमके कोणते उपचार द्यायचे याची अचूक ज्ञान झाले आहे. या सर्वांचा परिणाम मृत्यूदर नीचांकी होण्यावर झाला आहे.
- डॉ. दिलीप कदम

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT