Hindu Janajagruti Samiti prevented pollution of Khadakwasla holi pune sakal
पुणे

Pune News : मानवी साखळीने रोखले, खडकवासल्याचे प्रदूषण

हिंदु जनजागृती समिती, पाटबंधारे विभागाचे जलाशय रक्षण अभियान

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून आलेले नागरिक खडकवासला धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी आले होते. त्यांच्यापासून जलाशय रक्षण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी, पाटबंधारे विभाग स्थानिक ग्रामस्थांनी मानवी साखळी करून जल प्रदूषण रोखले.

‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ दरवर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमीला आयोजित केले जाते. यंदाच्या अभियानात खडकवासला ग्रामस्थ, खडकवासला पाटबंधारे विभाग अण्णासाहेब मगर कॉलेजचे प्राध्यापक व विध्यार्थी आणि सिंहगड पावित्र्य मोहीमेत सहभागी झाल्या होत्या.

पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचना फलक लावले होते. दुपारनंतर वारा, विजांचा कडकडाट सुरु होता. पावसाची हजेरी होती. तरी अभियान सुरु होते. महिला ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग होता.

श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पुजन करून आमदार भीमराव तापकीर यांनी अभियानाचे उद्घाटन केले. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, शाखा अभियंता सुभाष शिंदे, स्थापत्य अभियंता दत्तात्रेय कापसे, वसंत ठाकर, पालिकेचे आरोग्य निरीक्षक रुपेश मते, भाजपचे खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे,

भाजपचे सचिव संघटक पश्चिम महाराष्ट्र दत्तात्रेय कोल्हे, माजी सरपंच विजय कोल्हे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, अण्णासाहेब मगर कॉलेजच्या प्रा.सविता कुलकर्णी, दत्तात्रेय जोरकर, गोऱ्हे बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य सुशांत खिरीड, सुजित तिपोळे, हरीश मते, मयूर पवार,अनिल मते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश खत्री, समितीचे पराग गोखले महेंद्र वालिया, यावेळी उपस्थित होते.

तापकीर म्हणाले, ‘हिंदु जनजागृती समिती दरवर्षी खडकवासला जलाशय रक्षण अभियान राबविते. दरवर्षी लाखो लिटर पाणी स्वच्छ ठेवण्याचे पवित्र कार्य करत आहे. मी देखील या उपक्रमात २०१२ पासून सहभागी होत आहे.’ जलाशयाभोवती मानवी साखळी करून उभे होते. दिवसभर रंग लाऊन आलेले नागरिक खडकवासला धरणाच्या परिसरात येत होते.

त्यांचे प्रबोधन करीत त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही. तसेच हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबविणे, त्यातील धार्मिक शास्त्र काय आहे. यासाठी समितीच्या वतीने माहिती फलकाद्वारे प्रबोधन केले. प्रबोधनानंतर अनेकांनी अभियानाचे कौतुक केले. रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे १२ मार्च रोजी हे अभियान असणार आहे. यामध्ये स्थानिकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

खडकवासल्यातील पाण्याचे रंगापासून रक्षणाचा उपक्रम खूप चांगला आहे. उपक्रमात सातत्य असून गेली २१ वर्षे खडकवासला पाटबंधारे विभागाचे सहकार्य आहे. हा उपक्रम असाच सुरु राहिला पाहिजे. त्यासाठी आमच्या विभागाचे सहकार्य राहील.

-विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT