पुणे

हिंदूं-मुस्लिम ऐक्याचा आदर्श : पोलिस अधीक्षक संदीप पाटील

डी. के. वळसे पाटील

मंचर - “येथील गणेश उत्सवात गुलाल, डीजे, डॉल्बी बंदी, मोहरम सणात हिंदूंचा व गणेशोत्सवात मुस्लिमांचा सक्रीय सहभाग मंचर शहरात आहे. या शहराचा आदर्श राज्यातील इतर शहरांनी घेतल्यास अल्पपोलिस बदोबस्तात गणेशोत्सवा व मोहरम सण साजरे करता येतील.’’ असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार सुषमा पैकीकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, मराठा क्रांती मोर्चाचे वसंतराव बाणखेले, अजय घुले, मुस्लीम समाजाचे नेते मुनीर शेख, हाजी मन्सूरखान पठाण, अल्लू इनामदार, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ते म्हणाले, “मुस्लीम समाजाने मातमची जागा व मोहरमच्या मिरवणुकीत अडचण निर्माण होऊ नये म्हणून गणेश मंडळांनी मंडपाच्या जागेत बदल केला आहे. हा निर्णय दोन्ही समाजांनी एकत्रितपणे केला आहे. राज्यात कोठेही बदलून गेलो तरी, येथील हिंदू व मुस्लीम समाजाच्या ऐक्याची माहिती देणार आहे. या उपक्रमाला प्रसार माध्यमांनी चांगली प्रसिद्धी द्यावी. जेणे करून याचा संदेश राज्यभर जाईल. गडचिरोलीत असताना १०० पोलिस कर्मचाऱ्यांची दारू सोडली. मला शासनाकडून व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळाला आहे. जो तरुण दारू सोडील त्याचा सन्मान मी करणार आहे. पोलिस दप्तरी मंचरचे संवेदनशील यादीत असलेले नाव रद्द व्हावे म्हणून शासनाकडे अहवाल सादर करणार आहे.’’

टोम्पे म्हणाले, “मराठा क्रांती मोर्चा प्रसंगी व गणेशोत्सव मिरवणुकीत पाणी व सरबताची व्यवस्था मुस्लीम समजामार्फत केली जाते. तर रमजान ईद सणाच्या वेळी हिंदू समाजातील लोक मुस्लीम बांधवांचा सन्मान करतात. त्यामुळे पोलिसांच्या अतिरिक्त बंदोबस्ताची गरज येथे वाटत नाही.’’

ध्वनीच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस खात्याने मागणी केल्यास पुणे जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत भरारी पथकाची व्यवस्था केली जाईल. असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर यांनी सांगितले. यावेळी पैकीकर, पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, सरपंच दत्ता गांजाळे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, मुस्लीम समाजाचे नेते राजू इनामदार, मनीषा गावडे यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन गणेश कडलग यांनी केले.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT