कळमनुरी : पक्षांतर्गत असलेल्या नाराजी, नंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत समेटासाठी झालेली फिसकटलेली बोलणी यामुळे माजी आमदार डॉ. संतोष टारफे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी चर्चा हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये सगळे काही ओक्के नसल्याचे चित्र असून, तसे झाले तर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊन सर्व राजकीय समीकरणे बदलू शकतात.
काँग्रेस पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून माजी आमदार डॉ. टारफे हे पक्षांतर्गत घडामोडी व कार्यक्रमापासून चार हात लांब राहिले होते. त्यातच डॉ. टारफे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, पक्षांतर्गत असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांच्या भेटीगाठी व चर्चाही झाल्या. मात्र, यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव आणि माजी आमदार डॉ. टारफे यांच्यामध्ये समेट होऊ शकली नाही. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेली मध्यस्ती निष्फळ ठरली आहे.
शिवसेना की भाजप?
डॉ. टारफे काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. डॉ. टारफे हे भाजप की शिवसेना यापैकी कुणाची निवड करतात हेही औत्सुक्याचे आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला मागील अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा सरकारच्या कार्यकाळात शिवसेनेची भूमिका पाहता टारफे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घ्यावा, असा आग्रह ही कार्यकर्त्यांनी लावून धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष टारफे यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलाचाली चर्चा सुरू केल्या आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या बोलाचाली नंतरच पुढील राजकीय दिशा ठरवून व निर्णय घेण्याची तयारी चालवली आहे.
काँग्रेस पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही. सर्व निर्णय एकतर्फी घेतले जातात. या प्रकाराला आपण कंटाळलो आहोत. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत.
- डॉ. संतोष टारफे, माजी आमदार, कळमनुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.