Security personnel outside Hinjewadi International School in Pune after a bomb threat triggered an emergency response by local authorities.
esakal
Hinjewadi International School Receives Bomb Threat : पुण्यातील हिंजवडी फेज 1 मधील एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बने उडवणून देण्याची धमकी ई मेलद्वारे मिळाली आहे. या धमकीच्या ईमेलमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर तातडीने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवण्यात आले आणि शाळा रिकामी करण्यात आली.याबबात माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने शाळेत दाखल झाले. यानंतर संपूर्ण शालेय परिसरात कसून तपासणी सुरू झाली.
हिंजेवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बुधवारी सकाळी शाळेच्या मुख्यध्यापकांना शाळेच्या आवारात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा ईमेल आला होता. यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
यानंतर स्थानिक पोलिसांसह, पिंपरी-चिंचवड पोलिस व बॉम्ब शोधक, नाशक पथक तातडीने कृतीत आले. याबाबत हिंजेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, धमकीच्या ईमेल मधील मजकुराची तपासणी केली जात आहे आणि बॉम्ब शोधक पथकाने शोध मोहिमही सुरू केली आहे. चौकशीचा भाग म्हणून ईमेलचा स्त्रोत देखील तपासला जात आहे.
याशिवाय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अशीही माहिती दिली की, शाळेतील प्रत्येक वर्गात कमी विद्यार्थी आहेत. यामुळे शाळेचा परिसर तातडीने रिकामा झाला. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे, तूर्तास तरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
ईमेल मधील मजूक पाहता, असे दिसून आले आहे की अशाप्रकारचे बॉम्बस्फोटाच्या धमकीचे खोटे ईमेल याआधी देखील पिंपरी-चिंचवडमधील काही प्रतिष्ठित शाळांना मिळालेले आहेत. अशीही माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.