Hirda which is the financial tool of the tribals has not been bought yet by government 
पुणे

आदिवासी बांधवांचे आर्थिक साधन असणाऱ्या हिरड्याची अद्याप खरेदी नाहीच; सरकारला दिला 'हा' इशारा

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव(पुणे): आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांचे महत्त्वाचे आर्थिक साधन असणारे हिरड्याची खरेदी राज्य सरकारकडून अद्याप सुरू नसल्याने आदिवासी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने तातडीने हिरडा खरेदी केंद्र सुरू करावी अन्यथा आंदोलन करावे लागे, असा इशारा बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी. बी. घोडे, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप थांबवणे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या उपजिविकेसाठी हिरडा पीक महत्त्वाचे आहे. दरवर्षी जून महिन्यात सरकारी हिरडा खरेदी केंद्र सुरू केली जातात. खरेदी केंद्राच्या माध्यमातून सरासरी दीडशे ते दोनशे रुपये प्रतवारीनुसार किलोसाठी बाजार भाव दिला जातो. सद्यस्थितीत जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा जाऊनही अद्याप हिरडा खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत. त्याचा फायदा उठवत खाजगी व्यापाऱ्यांनी मातीमोल दराने खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

आदिवासी भागातील शोषित वंचित आदिवासी शेतकऱ्यांच्या हिरड्याच्या पिकाला पाचशे रुपये प्रति किलो किमान हमी भाव मिळावा. हिरडा गोळा करताना आदिवासी बांधव आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. झाडाच्या शेंड्यावर जाऊन हिरडा तोडावा लागतो. हिरडा हे पीक आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सध्या हिरडया पिकावर आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालू आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईच्या काळात पाचशे रुपये किमान हमी भाव मिळावा. आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

आदिवासी नेते दिलीप कांबळे म्हणाले, ''जंगलातून तोडून आणल्यानंतर रोज उन्हामध्ये वाळत घालावा लागतो. पायाने मळावा लागतो. तेव्हा तर चांगला तयार होतो तेव्हा कुठेतरी चांगला भाव मिळतो.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT