The historical lal mahal from pune will open soon 
पुणे

पर्यटकांसाठी खूशखबर! ऐतिहासिक लाल महाल लवकरच होणार खुला

सकाळवृत्तसेवा

पुणे : दुरूस्तीच्या नावाखाली लाल महाल बंद ठेवण्यात आला असून, सर्वांसाठी खुला न केल्यास संघर्ष करावा लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने महापालिका प्रशासनाला दिला. दरम्यान, लाल महालात दुरुस्तीची कामे सुरू असली तरी लवकरच तो सर्वांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा  

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी चर्चा केली. राज्यातून शेकडो पर्यटक येतात, मात्र त्यांना प्रवेशद्वारावरून परत पाठविले जाते. लाल महाल एखाद्या समारंभासाठी खुला केला जातो. परंतु त्यासाठी शिवप्रेमींना प्रशासनाशी वाद घालावा लागतो. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे लाल महाल जाणीवपूर्वक बंद ठेवला आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

महत्त्वाची बातमी : इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी

लाल महालातील दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावीत. लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांचाही पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, सारिका जगताप, मंदार बहिरट, विनायक घुले, सचिन जोशी आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT