vishrantwadi.jpg 
पुणे

लोहगाव अन् औंधमध्ये चिनी मालाची होळी...

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : लोहगावमधील वाघोली रस्त्यावरील कर्मभूमी सोसायटीमध्ये चीनचा निषेध करण्यात आला. भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या चिनचा ध्वज व चायनीज वस्तू जाळून निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थित सर्वांनी शपथ घेऊन यापुढे चायना वस्तू न वापरण्याचा  निर्धार केला. तसेच हुत्मामा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी कर्मभूमी प्रतिष्ठान व डेव्हलपर्सचे संचालक सुनील खांदवे- पाटील, मोहनराव शिंदे-सरकार यासह सोसायटीमधील सर्व आजी-माजी सैनिक व रहिवाशी सहभागी झाले होते. भारतीय सैनिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय सर्वांनी घेतला.

औंधमध्ये चिनी मालाची होळी...
औंध : महाळुंगे (पाडाळे) येथे ग्रामस्थांच्या वतीने चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकत त्याची होळी करण्यात आली. यावेळी चीनच्या दुटप्पी कृत्याचा निषेध करण्यात आला तसेच चिनी बनावटीच्या वस्तूंची खरेदी व विक्री न करण्याची शपथ  घेण्यात आली.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चीनच्या विरोधात घोषणा देत चिनी वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी सागर पाडाळे, तुषार हगवणे, काळुराम गायकवाड, लक्ष्मण पाडाळे, सदाशिव मोरे, दयानंद बाबर, जीवन कोळेकर, नाना घुले, सचिन अहिरे, बाळासाहेब पाडाळे, सुनील सुतार, महेश गव्हाणे, सागर पाडाळे, ओम पाडाळे, मोहन पाडाळे, संजय इंगवले, गोविंद इंगवले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लील व्हिडीओ बनवून अत्याचार; १५ तरुणींचं लैंगिक शोषण, लव्ह जिहादचा संशय!

Mirabai Chanu: मीराबाई चानू आशियाई स्पर्धेत मुकणार? खांद्याच्या दुखापतीने संकट उभे केले!

Solapur Politics: सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा निर्णय ठरणार? विधानपरिषदेवर नवा की जुना चेहरा याची उत्सुकता, राजकीय चर्चांना उधाण!

Mumbai : ICUत बेड नसल्यानं स्ट्रेचरवर ठेवलं, खाली पडून तरुणीचा मृत्यू; तर आणखी एका रुग्णानेही बेड अभावी गमावला जीव

Nanded News: नांदेड विभागातील तपोवन व मराठवाडा एक्स्प्रेसला २ अतिरिक्त सामान्य डबे; प्रवाशांसाठी सुटसुटीत सुविधा

SCROLL FOR NEXT