देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  esakal
पुणे

Amit Shah in Pune:मोदींनंतर अमित शाह देखील करणार पुण्याची वारी, चिंचवडमध्ये लावणार कार्यक्रमाला हजेरी

HM Amit Shah:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले. त्यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री सहकारमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Amit Shah Pune:नुकतेचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तीने पुण्यात येऊन गेले. त्यांनी यावेळी पुणे मेट्रोच्या फेस-१ चे उद्घाटनही केले. मोदींनंतर अमित शाह देखील पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण होणार आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले. त्यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री सहकारमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करणार आहेत. हा कार्यक्रम चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडणार आहे.

हा कार्यक्रम ६ ऑगस्टला दुपारी १२ वाजता पार पडेल. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिली होती पुण्याला भेट

मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देऊन, गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदी यांनी जाहीर झाला होता. या पुरस्काराला शरद पवार यांनीही हजेरी लावली होती. त्यांच्या या भेटीवर अनेकांचं लक्ष लागून होतं.

नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर पुणे मेट्रोच्या फेस-१ चे उद्घाटन केले. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १०००० पेक्षा जास्त घरांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT