Sakal-Exclusive 
पुणे

पुण्यात होम क्वारंटाइन फक्त नावापुरतेच!

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या साथीत परराज्यांतून आलेले आणि होम क्वारंटाइनची सक्ती असलेले विमान प्रवासी बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्या हातावर शिक्का असला, तरी घरी आल्यानंतर त्यांच्यावर कुठलीही यंत्रणा लक्ष ठेवत नाही. त्यामुळे तीन महिन्यांत विविध राज्यांतून आलेल्या दोन लाख प्रवाशांनी होम क्‍वारंटाइन नावापुरतेच पाळले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांतून पुण्यात दररोज साडेतीन ते पावणेचार हजार प्रवासी येतात. खबरदारी म्हणून प्रत्येक प्रवाशांनी किमान सात दिवस घरीच विलग राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी लोहगाव विमानतळावर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांच्या माध्यमातून प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येते. प्रवासी कोठून आला, त्याची कारणे, मुक्कामाचा कालावधी अन ठिकाण या नोंदी ठेवण्यात येतात. खासगी कारणांसह कार्यालयीन कामकाजासाठी प्रवास केलेल्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात येते. तेव्हाच प्रवासानंतरच्या सात दिवसानंतर आरोग्याच्या कारणाशिवाय घराबाहेर येणार नाही, याची हमीही संबंधितांकडून घेण्यात येते. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्‍य होणार असल्याची आशा महापालिकेला होती. मात्र, अशा प्रवाशांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढल्याचे निर्दशनास आले.

शिक्का पुसला जातो
विमानतळावर प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येतो. त्यावर विलग राहण्याच्या कालावधीचाही उल्लेख असतो. परंतु, या शिक्‍क्‍याच्या शाईचा दर्जा चांगला नसल्याने तो काही तासांतच पुसला जातो. तर काही प्रवासी तो धुऊन काढतात. या कालावधीत एखाद्या यंत्रणेकडून चौकशीसाठी फोन आला तर तो घेतला जात नाही किंवा तो लागत नसल्याचीही महापालिकेची निरीक्षणे आहेत. 

महाराष्ट्रबाहेरुन आलेले प्रवासी

  • १ लाख ९५ हजार तीन महिन्यांमध्ये
  • ३७०० रोज येणारे प्रवासी 
  • ६ तपासणीसाठी अधिकारी-कर्मचारी 

परराज्यांतून येणारे प्रवासी घराबाहेर येणार नाहीत, यासाठी प्रत्येकाची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडे दिली जाते. घराच्या पत्त्यासह मोबाईल क्रमांकाचाही समावेश असल्याने रुग्ण नेमका कुठे आहे, याची माहिती मिळविणे शक्‍य होत आहे. मात्र, ते घराबाहेर आल्यास कारवाई केली जाईल.
- अशोक घोरपडे, उपायुक्त, पुणे महापालिका 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT