indapur sakal
पुणे

राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा घरी जाऊन सत्कार

लक्षवेधी यश मिळविणाऱ्या कल्याणीचा सन्मान सुरवडला घरी जावून हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार

सकाळ डिजिटल टीम

इंदापूर: सुरवड (ता. इंदापूर) येथील कल्याणी माने हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण संपादन करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून लक्षवेधी यश संपादित करून इतिहास घडविला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी कल्याणीच्या घरी जावून तिचा सत्कार करून कौतुक केले.

कोणताही क्लास न लावता दहा बाय दहा फुटाच्या कुडाच्या खोलीत राहून अभ्यास करून कल्याणीने यश संपादन करून इतिहास घडविला आहे. बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता दहावीची कल्याणी ही विद्यार्थिनी असून, या शिक्षण संस्थेचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष आहेत.

कल्याणीने संपादन केलेल्या यशामुळे शिवाजीविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. त्यामुळे पाटील यांनी तिचा घरी जावून सत्कार केला. यावेळी कल्याणी हिने भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) जाऊन अधिकारी होवून देशसेवा करणार असल्याचे सांगितले. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव तथा बावड्याचे सरपंच किरण पाटील, दादासाहेब घोगरे, सुरेश मेहेर, सुरेश घोगरे, रावसाहेब घोगरे, दशरथ घोगरे, प्रकाश घोगरे,जी.जे. जगताप उपस्थित होते.

कुटुंबीयांना घरकुल देण्याची सूचना :

सत्कारप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कल्याणी माने हिचा इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणाचा खर्च श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी करेल, अशी घोषणा केली, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माने कुटुंबीयांना घरकुल देण्याची सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

SCROLL FOR NEXT