Honorarium is pending for 3 months the teachers who work on the hourly basis.jpg 
पुणे

तासिका तत्वावरील शिक्षकांचे ३ महिन्यांचे मानधन रखडले

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मागील ३ महिन्यांपासून महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन रखडले आहे. त्यामुळे, सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गेल्या वर्षी शहरातील महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये ६० मराठी आणि १८ उर्दू माध्यम अशा एकूण ७८ शिक्षकांची तासिका तत्वावर भरती करण्यात आली होती. त्यात ४ क्रीडा शिक्षकांचाही समावेश होता. मात्र, त्यापैकी, अनेक शिक्षकांचे मागील ३ महिन्यांपासून मानधन रखडले आहे. 


पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!

पालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पराग मुंढे म्हणाले, "पालिकेच्या अंदाज पत्रकात तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनाची तरतूद अपुरी पडली. त्यामुळे, त्यांचे मानधन देता आले नाही. मात्र, त्यासाठी वर्गीकरण करून अपेक्षित रक्कमेची तरतूद झाली आहे. चालू महिन्यात त्यांना त्यांचे थकीत मानधन मिळेल. त्यातील काही शिक्षक निवृत्त झाले आहेत. तर, मानधन अपुरे पडत असल्याने काही शिक्षक तासिका तत्वावर काम करण्यास उत्सुक नाहीत किंवा रूजू होत नाहीत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे २०२०-२१ मध्ये तासिका तत्वावरील शिक्षकांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. जवळपास १०५ शिक्षकांची भरती करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात क्रीडा शिक्षकांचीही संख्या १४ इतकी वाढविण्यात येणार आहे. तसेच त्यांना दरमहा १० ते १५ हजार रुपयांचे मानधन देण्याचे विचाराधीन आहे."
 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT