Scientist Sakal
पुणे

शेतकऱ्यांसाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचा सन्मान

एनसीएलचे जैवरसायनशास्त्रज्ञ डॉ.राकेश जोशी यांना ‘युवा वैज्ञानिक पुरस्कार’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : किटकांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. तर दुसरीकडे कीटकनाशक नाका तोंडात गेल्यामुळे त्यांना जीवही गमवावा लागतो. यावर उपाय म्हणून फक्त कीटकांनाच लागू पडतील अशी रसायने शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील जैवरसायनशास्त्रज्ञ डॉ. राकेश जोशी करत आहे. त्यांच्या संशोधनातील अभिनव योगदानाबद्दल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) वतीने ‘युवा वैज्ञानिक २०२१’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मुळचे नाशिकचे असलेले डॉ. राकेश जोशी यांनी केटीएचएम जैवतंत्रज्ञान विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तर पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात घेतले.त्यानंतर एनसीएलमध्ये पीएचडी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवमाहिती आणि जैवतंत्रज्ञान विभागात (आयबीबी) ते पाच वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

डॉ. जोशी म्हणतात, ‘‘मागच्या दहा वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आपण या विषयाकडे मुळाशी जाऊन कधीच पाहिले नाही. युवा पिढीला एकीकडे शेती तर करायची नसते आणि त्यातील संशोधनातील कल सुद्धा कमी असतो. यावर एक प्रयत्न म्हणून, माझ्या संशोधनाच्या माध्यमातून फक्त किटकांवरच प्रभावी ठरणाऱ्या औषधांचा मी शोध घेत आहे.’’ देशातील ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि संशोधनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैज्ञानिकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा सात युवा वैज्ञानिकांना गौरविण्यात आले.

देशाच्या गरजेनुसार संशोधन करण्याची नितांत गरज आहे. परिस्तिथीसापेक्ष आणि प्रगल्भ संशोधन नक्कीच आपल्या देशाला ‘सुजलाम सुफलाम’ बनविणार.- डॉ. राकेश जोशी, वैज्ञानिक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana October Installment : लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा? समोर आली महत्त्वाची अपडेट, सरकारकडून अधिकृत घोषणा कधी?

IND vs NZ 2nd ODI Live : भारताच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडची दैना! आकिब नबी, गुरनूर ब्रार चमकले; शुभमन गिलची चूक मात्र महागात पडली

अवघ्या २ कोटींचं बजेट, जगभरात ४५० कोटींची कमाई; 'हनुमान अंश' आता ओटीटीवर होणार रिलीज, कुठे पाहता येणार?

Latest Marathi News Live Update: अभिनेते सयाजी शिंदे कर्जतमध्ये दाखल

'हे कधी थांबणार?' मुलींवरील अत्याचाराच्या घटनांवर दीप्ती केतकर भावुक; मालिकेत साकारणार संवेदनशील कथानक

SCROLL FOR NEXT