Abhijit Pawar sakal
पुणे

Abhijit Pawar: स्त्रीतत्त्वाला समाजात प्रतिष्ठा हवी, अभिजित पवार, समाज बदलण्याआधी स्वतःला बदला; ‘तनिष्का वकील फोरम’चा कार्यक्रम

Women Empowerment: देवीतत्त्व म्हणजे पूजेसाठीचा विषय नव्हे, तर प्रत्येक स्त्रीतील दिव्यता आहे,'' असे अभिजित पवार यांनी सांगितले. ‘तनिष्का वकील फोरम’मध्ये स्त्रियांच्या सन्मानावर भर देत त्यांनी समाज बदलण्याआधी स्वतःमध्ये बदल करण्याचा संदेश दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘स्त्रीतत्त्वाला समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. देवीतत्त्व केवळ पूजनीय संकल्पना नसून, ती प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील दिव्य ऊर्जेचे मूर्त रूप आहे. सनातन भारतीय संस्कृतीतील मूल्यांमध्ये याच देवीतत्त्वाचा सन्मान आणि प्रतिष्ठाही आहे,’’ अशा शब्दांत ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी स्त्री शक्तीचा गौरव करत, समाज बदलण्याआधी स्वतःला बदला, असा सल्ला दिला.

‘तनिष्का व्यासपीठा’तर्फे आयोजित ‘तनिष्का वकील फोरम’च्या विशेष कार्यक्रमात पवार बोलत होते. शहरी-ग्रामीण भागातील महिला वकिलांशी संवादाचा हा कार्यक्रम सुमारे दीड तास रंगला. दैनंदिन जीवनातील प्रश्नांपासून ते सामाजिक बदलांपर्यंत अनेक मुद्द्यांचा ऊहापोह पवार यांनी केला.

अभिजित पवार म्हणाले, ‘‘पारतंत्र्याच्या काळात आपल्यामध्ये ब्रिटिश शिक्षणपद्धतीने रुजवलेली कारकुनीवृत्ती स्त्री-पुरुष दोघांमध्ये प्रतिष्ठा आणि आत्मभान गमावण्याचे मूळ कारण ठरली. त्या चौकटीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. स्त्री मूलतः न्यायवादी, भावनाशील आणि संतुलन साधणारी शक्ती आहे. तिच्यामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक समतोल नैसर्गिकरीत्या असतो. त्यामुळेच स्त्रीतत्त्वाची प्रतिष्ठा ही वैयक्तिक आयुष्यापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत अत्यावश्यक आहे. स्त्रीचे पूजन होते, तिथे देवतेचे वास्तव्य असते. याला साजेसा दृष्टिकोन आपण साकार केला पाहिजे.’’

आजचे सामाजिक वातावरण नकारात्मक बनल्याचे नमूद करून पवार म्हणाले, ‘‘समाज अधोगतीकडे चालला आहे. केवळ भौतिक सुखांमागे धावल्याने समाजाने समाधान गमावले आहे. ते प्राप्त करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी भक्ती, उपासना आणि साधना आवश्यक आहे. त्याशिवाय समाजप्रबोधनाचा प्रयत्न अपूर्ण राहतो.

प्रत्येक कुटुंबात एक न्यायव्यवस्था असते. कुटुंबामध्ये वडील व आई करीत असलेला न्यायनिवाडा व त्यांची वाद मिटविण्याची पद्धत वेगवेगळी असते. तेढ निर्माण झाल्यास स्त्रिया तो प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. स्त्रियांचा सन्मान केला नाही, तर कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. ही बाब गाव, राज्य आणि देशाच्या बाबतीतही लागू होते. त्यामुळे आधी वैयक्तिक आयुष्यात स्त्रीची प्रतिष्ठा राखली पाहिजे. मग समाज, गाव, राज्य, देशात स्त्रियांचा सन्मान होईल.’’

भारतीय परंपरेतील न्यायव्यवस्थेचे दाखले देत पवार म्हणाले, ‘‘कुटुंबातील स्त्री केवळ वकील नसून, ती न्याय, करुणा आणि विवेक यांचा संगम आहे. महिला वकिलांनी घटनांचे आकलन मातृदृष्टीने करावे आणि वाद मिटवताना ज्ञानमार्ग, धर्ममार्ग आणि श्रद्धामार्ग यांचा आधार घ्यावा. भारत म्हणजे केवळ एक भौगोलिक संकल्पना नव्हे, तर तो ऊर्जा निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा समूह आहे आणि स्त्री त्या ऊर्जेचा मूळ स्रोत आहे.’’ ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट’चे सरव्यवस्थापक प्रदीप वेदपाठक यावेळी उपस्थित होते. वेदपाठक यांनी ‘तनिष्का’ची माहिती दिली. सूत्रसंचालन सागर गिरमे यांनी केले.

‘तनिष्कां’चा सन्मान

‘तनिष्का’ उपक्रमाच्या वाढीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या रोहिणी बांदल, पल्लवी चाकणकर, मीनाक्षी नाईक, ज्योती बालवडकर, कोमल टेमगिरे, अमिता बांदल, डॉ. रितू लोखंडे, डॉ. स्मिता जोशी आणि अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. ‘प्ले डेट’च्या गंधाली भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित वकील महिलांसाठी धम्माल मस्ती आणि करमणुकीचे खेळ घेतले. यावेळी त्यांनी विविध खेळांचा मनमुराद  आनंद   लुटला.

स्त्रीतत्त्वांची प्रतिष्ठा वाढवण्याची चतु:सूत्री

  • आध्यात्मिक प्रतिष्ठा

  • स्त्रीला देवीतुल्य मानणे म्हणजे तिच्यातील आत्मशक्तीला जागृत करणे. उपासना, नामस्मरण, ध्यान यांमार्फत तिचा अंतःप्रकाश वाढवणे.

  • सामाजिक प्रतिष्ठा

  • निर्णयप्रक्रियेत स्त्रीचा सशक्त

  • सहभाग, न्यायव्यवस्थेत न्यायदर्शी

  • दृष्टिकोनातून तिचे मत ऐकणे

  • वैयक्तिक आत्मबळ

  • तिचा आत्मविश्‍वास, अभिमान

  • आणि ज्ञानवृद्धी याला पोषक

  • वातावरण देणे.

  • प्रतीकात्मक प्रतिष्ठा

  • स्त्रीच्या नावाने योजनांचा शुभारंभ करणे, तिच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणे, व्यासपीठावर तिला अग्रस्थानी स्थान देणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधणाला मिळणार डबल गिफ्ट, जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार?

Chandrakant Patil : शिक्षकांनी गुरूंचे स्थान उंचावले पाहिजे, चंद्रकांत पाटील यांचे मत; विकसित भारताबाबत परिसंवाद

Solapur Crime: साडेतीन लाखांचे दागिने शेटफळ येथून लंपास; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

Incense Smoke Harmful : अगरबत्तीचा धूर सिगारेटपेक्षा अधिक धोकादायक; धडकी भरवणारा रिसर्च समोर, कॅन्सरच्या धोक्याचीही शक्यता!

Latest Maharashtra News Updates : मुंबईत पहाटेपासून पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT