Hotel-Raj 
पुणे

पुण्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच; प्रसिद्ध हॉटेल चालकाने घेतला गळफास

सकाळवृत्तसेवा

धायरी (पुणे) - सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका हॉटेल व्यवस्थापकाने हॉटेल मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज गुरुवारी (२५ जून) रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात आत्महत्येच्या वाढत्या घटना
पुण्यात गेल्या आठवडाभरात जवळपास दहा जणांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. यात आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कोरोना त्यानंतर आलेला लॉकडाउन यामुळं अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत. रोजगाराच्या संधी नसल्यामुळं अनेकांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. पुणे पोलिसांनीही या घटनांची गंभीर दखल घेतली असून, समुपदेशनासाठी वेगळी टीम कार्यान्वित केली आहे.

नैराश्येतून हॉटेल मालकाचे कृत्य
प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय ४३ वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. लॉक डाऊन मुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होते. त्यामुळे नैराश्य येऊन यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून हॉटेल राज चालवत होते. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर सदर घटना उघडीस आली. एका नगरसेवकाच्या ऑफिस शेजारील राज हॉटेलमध्ये आत्महत्या करण्यात आली. घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्याने मी आत्महत्या करीत असून माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यात लिहिले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT