housewives prepared weekend special feast youth spent time on OTT On first day of week lockdown 
पुणे

पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचा असा होता पहिला दिवस 

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या राज्य सरकारने कडक निर्बंध आणि विकेंडला पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. तर लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी घरी राहूनच नागरीकांनी सहकार्य केले. बाहेर जाता येत नसल्यामुळे गृहिणींनी घरातच विशेष मेजवानी तयार करत तसेच कुटुंबियांसोबत वेळ घालवला. काहींनी पुस्तक वाचून तर बहुतांश लोकांनी मनोरंजनासाठी ओटीटीचा पर्याय निवडला. मागील काही महिन्यांपासून शहरात सर्व काही पूर्वी प्रमाणे सुरू झाले होते. तर शहरात विविध ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची रेलचेल सुद्धा वाढली होती. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लोकांचे फिरण्याचे प्लॅन्स असतात. तर काही परिवारासोबत हॉटेलमध्ये जाण्याचे नियोजन करतात. मात्र सध्या लॉकडाउन
असल्यामुळे नागरिकांना घरीच राहून वेळ घालवावा लागत आहे.

हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

"माझे पती बँकेत कामाला आहेत. दररोज ते कामावर जात असल्यामुळे आम्ही शनिवारी आणि रविवारी मुलांना घेऊन बाहेर फिरण्यासाठी जात होतो. मात्र आता विकेंडला लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही घरीच आहोत. त्यात मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून मुलांसोबत विविध खेळ खेळत आहोत."
- तृप्ती पाटील, गृहिणी

"आता कुठेतरी घरा बाहेर पडणे शक्य झाले होते. त्यात हा लॉकडाउन पुन्हा लावल्यामुळे आता बाहेर पडणे शक्य नाही. पुन्हा गेल्या वर्षीप्रमाणे घरातच राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वेबसिरीज, चित्रपट अश्या अनेक गोष्टी पाहून मन रमविण्याचा प्रयत्न करत आहे."
- अजित सिंग

कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अ‍ॅम्ब्युलन्स

असा होता नागरिकांचा विकेंड लॉकडाऊन
- कुटुंबातील अत्यावश्यक सेवेतील सदस्य सर्व खबरदारी घेत घराबाहेर पडले
- येणाऱ्या सणानिमित्त घरातील स्वच्छतेला दिले प्राधान्य 
- मनोरंजनासाठी ओटीटी, टीव्ही, समाज माध्यमांचा वापर
- लहान मुलांनी पालकांसमवेत घरातच राहून काही खेळ खेळले
- ज्येष्ठांनी विविध पुरवणींचे केले वाचन
- पुस्तक वाचनाला दिले प्राधान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

Cameron Green: काल आयपीएल लिलावात २५.२० कोटी मिळाले अन् आज पठ्ठ्या भोपळ्यावर बाद झाला... KKR ला फसल्यासारखं झालं...

Viral Video: 'सर, हेल्मेट है, फिट नही आता', वृद्ध दुचाकीस्वाराचं उत्तर ऐकून सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

Kolhapur Forest Incident : बंदुका, सर्च लाईट, दोरी; शिकारींचा जंगलात रात्रीस खेळ चाले, वन विभागाने थरारकरित्या पाठलाग केला अन्

Latest Marathi News Live Update : लातुरात काँग्रेसच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

SCROLL FOR NEXT